-
ताडोबा-अंधारी व्याघप्रकल्पाने भल्याभल्यांना वेड लावले आणि त्यांना वेड लावणाऱ्या या व्याघ्रप्रकल्पातील वाघांनीही त्यांना निराश केले नाही.
-
या व्याघ्रप्रकल्पात वाघीण आणि तिच्या शावकांनी पर्यटकांना कधी निराश केले नाही. वाघिणीने शावकांना जन्म दिल्यानंतर वाघाची जणू जबाबदारीच संपते. मात्र, येथेही अपवाद असतात.
-
‘राका’ या वाघाने तेच दाखवून दिले. ‘राका’ अनेकदा त्याच्या बछड्यांसहीत ताडोबात फिरताना आढळून येतो.
-
‘राका’ हा वाघ आणि सोबत त्याचे दोन शावक बरेचदा खेळताना आढळतात. हे दोन्ही शावक वाघाच्या अंगावर खेळत आणि ‘राका’ देखील त्यांचे हे बालपण तेवढ्याच प्रेमाने उपभोगताना कित्येकदा दिसून येतो.
-
याच बछड्यांचे पोट भरण्यासाठी तो शिकार देखील करतो. त्याची दमदार चाल कायमच पर्यटक अनुभवतात.
-
अलीकडेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मामला परिसरात वास्तव्य असलेल्या ‘राका’ या वाघाचा दमदार चालीचा व्हिडिओ समाजमाध्यमावर बराच प्रसिद्ध झाला.
-
या व्याघ्रप्रकल्पातील तो एक देखणा वाघ समजला जातो. उन्हाळ्यात रखरखत्या उन्हात तो पाणवठ्याजवळ तासनतास बसलेला असतो.
-
पर्यटकांची जिप्सी दिसली तर ‘गुरर्र’ करुन इशारा देत पुन्हा निवांत बसतो. नंतर तो जिप्सीची दखलही घेत नाही. पाणवठ्याजवळ गारठा अनुभवत आणि जांभया देत निवांत पहूडलेला असतो.
-
सर्व छायाचित्रे – गजेंद्र बावणे (हेही पाहा : बोर व्याघ्रप्रकल्पाची राणी ‘कॅटरिना’)

रत्नागिरीला सुके मासे खाल्ले अन् माझं ब्लड प्रेशर…; अशोक सराफांनी ‘फिटनेस’वर केलं भाष्य; म्हणाले, “त्या दिवसापासून…”