-
कर्नाटक विधानसेभेचे निकाल येण्यास सकाळपासून सुरुवात झाली. त्यात काँग्रेस पक्ष आघाडीवर असल्याचे आणि विद्यमान सत्ताधारी भाजपा पिछाडीवर गेल्याचे कळताच इंटरनेटवर मजेशीर मिम्स व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे.
-
पुढील वर्षी होणाऱ्या ‘लोकसभा निवडणूक २०२४’ साठी कर्नाटकात विजय मिळवणे काँग्रेससाठी खूप महत्त्वाचे झाले होते. त्यासाठीच राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यान कर्नाटकात बरीच पायपीट केली होती आणि वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला होता.
-
कर्नाटक निवडणुकीचे निकाल स्पष्ट व्हायला अजून काही अवधी आहे. पण दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेसने ११८ जागांवर आघाडी घेतली होती. बहुमताचा आकडा ११३ आहे.
-
काँग्रेसचे मातब्बर नेते सिद्धरामय्या यांनी वरुणा येथून, विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शिग्गाव, डीके शिवकुमार यांनी कनकपुरा या मतदारसंघातून आघाडी घेत आपली प्रतिष्ठा राखली आहे.
-
भाजपानेही सत्ता राखण्यासाठी खूप प्रयत्न केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाला भिंगरी लावून राज्य पिंजून काढले. भव्य रोड शो, जाहीर सभांमधून भावनिक आवाहन असे अनेक प्रयत्न पंतप्रधान मोदी यांनी केले.
-
कर्नाटका हे दक्षिणेतील असे एकमेव राज्य आहे, जिथे भाजपाने आजवर विजय मिळवून सत्ता राबवली आहे. त्यामुळे कर्नाटकची सत्ता राखणे हे भाजपासाठी मोठे आव्हान बनले होते. भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने विकास, महागाई, रोजगार आणि भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवर भर दिला होता.
-
कर्नाटमध्ये काँग्रेस सत्तेच्या जवळ गेला असला तरी सत्ता मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. कारण सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार या दोन मोठ्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
-
भाजपा आणि काँग्रेसच्या दरम्यान सरळ लढत असली तरी जेडीएस हा कर्नाटकातील महत्त्वाचा पक्ष आहे. जर दोन्ही पक्षापैकी कुणालाही बहुमताचा आकडा गाठता आला नाही. तर जेडीएस किंगमेकरच्या भूमिकेत असेल. २०१८ साली अवघ्या ३५ जागा मिळून देखील काँग्रेसने जेडीएसचे प्रमुख एचडी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देऊ केले होते.
-
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दल आणि इस्लामिक स्टेटशी कथित संबंध असलेल्या पीएफआय या संघटनेवर बंदी आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर भाजपा आणि बजरंग दलाने काँग्रेसवर येथेच्छ टीका केली. काँग्रेसचा विजय पाहून बजरंग दलाची झालेली अवस्था… यावर व्हायरल होणारे हे मिम

Crime News : पुण्यात चाकूचा धाक दाखवून १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना पोलिसांनी केली अटक