-
जगभरात कित्येक एअरलाइन कंपन्या आहेत ज्या कमीत कमी किंमतीत आपल्या सेवा देऊन प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. काही कंपन्या अशा आहेत की ज्या फक्त तिकाटांची किंमत फक्त कमी करत नाही तर इतर अनेक सुविधा देत असतात ज्यामुळे प्रवासी त्यांच्या विमानातून प्रवास करतील
-
पण व्हिएतनामामध्ये एअरलाइन कंपनी या सर्वबाबतीत अगदी वेगळी आहे. ही एअरलाईन कमी किंमतीत सेवा तर देतातच त्याचबरोबर त्यांच्या हवाई सुंदरींना छोटे कपडे परिधान करण्याची परवानगी दिली होती. कित्येक लोक या हवाई सुंदरींना पाहण्यासाठी विमानाने प्रवास करतात.
-
आम्ही बिकिनी एअरलाइनबाबत सांगत आहोत. व्हिएतनाममध्ये २०११साली पहिल्यांदा एक खासगी एअरलाईन सुरु करण्यात आली होती. बघता बघता ही व्हिएतनामधील सर्वात लोकप्रिय एअरलाइन झाली आहे. याचे कारण होते एक जाहिरात आणि तो पोशाख जो हवाई सुंदरी विमान उड्डान करताना परिधान करत असे. एअरलाइन्सने सुंदर दिसणाऱ्या हवाईसुंदरीची निवड केली होती.
-
जेव्हा ही विमानसेवा सुरू झाली तेव्हा ती व्हिएतनामची देशांतर्गत विमान कंपनी होती. पण विमान उड्डान करताना हवाई सुंदरी बिकिनीमध्ये दिसू लागल्या. या प्राइवेट एअरलाइन्सचे नाव व्हिएत जेट एअरलाइन्स होते परंतु मीडिया आणि लोकांमध्ये हे बिकिनी एअरलाइन्स म्हणून ओळखू जाऊ लागले. तेव्हापासून हे एअरलाइन खूप वादात अडकले होते.
-
एअरलाइनवर महिलांचा अपमान करण्याचा तर कधी अश्लिलता पसरविण्याचा आरोप लावण्यात आला. व्हिएतनाम एव्हिएशन अॅथॉरेटीने २०१२मध्ये कंपनीला ६२ हजार रुपये दंड लावला होता.
-
स्वत:च्या कतृत्वाच्या जोरावर व्हिएतनामची महिला Nguyen Thi Phuong Thaoने ही एअरलाइन्स सुरु केली आहे. महिलेचे नाव २०१६ मध्ये सर्वात शक्तिशाली बिझनेसवुमन या यादीमध्ये समाविष्ट होते.
-
भारतात या एअरलाईन्सची कंपनी सुरू झाली आहे आणि भारतातून व्हिएतनामला या एअरलाईन्सच्या मदतीने जाऊ शकता. पण हवाई सुंदरीचा पोशाख आता तसा नाही जसा पूर्वी होता.
-
आता हवाई सुंदरी बिकिनीमध्ये नव्हे तर टीशर्ट आणि शॉर्ट परिधान करतात. या प्लेनचे तिकीट खूप स्वस्त आहे .

Sharad Pawar : शरद पवारांची प्रतिक्रिया; “नीलम गोऱ्हेंनी केलेलं वक्तव्य मूर्खपणाचं, यापेक्षा…”