-
भारतीय रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने शुक्रवारी मोठा निर्णय घेत २ हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
-
ग्राहकांना २३ मे २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत या नोटा बॅंकांमध्ये बदली करता येणार आहेत.
-
आरबीआयने २ हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्यावर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.
-
बॉलीवूड चित्रपटांमधील अनेक सीन्स आणि गाणी एडिट करुन नेटकऱ्यांनी मीम्स बनवले आहेत.
-
ट्विटरवर एका युजरने २ हजारांच्या नोटांना रणबीर कपूरच्या ‘चन्ना मेरेया’ गाण्याचा संदर्भ देत “अच्छा चलता हूं दुआओं में याद रखना” असे कॅप्शन दिले आहे.
-
दुसऱ्या एका युजरने दोन हजारांच्या फोटोंवर हार घातलेला फोटो शेअर करत स्वर्गवासी होण्यापूर्वी २ हजारांच्या नोटांना श्रद्धांजली अर्पण करा, असे कॅप्शन दिले आहे.
-
दोन हजारांची नोट इतर नोटांना “आता मी येतच नाही” सांगत आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
-
‘आम्ही मिमकर’ या पेजने मराठीतील प्रसिद्ध चित्रपट ‘अशी ही बनवाबनवी’ मधील सीन रिक्रिएट करत बाद झालेल्या नोटा इथेच राहतात का? असा प्रश्न विचारुन जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटांबरोबर २ हजारांची नोट सामील झाल्याचे दाखवले आहे.
-
“ती दोन हजारांची नोट वारली”, “ही दोन हजारांची नोट मोदींनी बंद केली हिला…” अशा प्रकारचे अनेक मीम्स शेअर करण्यात आले आहेत.
-
“कर्नाटकमध्ये दोन हजारांच्या नोटांचा काही उपयोग नाही झाला म्हणून बंद करतोय…”
-
दोन हजारांच्या नोटा २३ मे पासून बँकांमध्ये बदलता येणार आहेत.
-
अचानक नोटा बंद झाल्याने सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे.

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती