-
जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीतील भारतीय नाव म्हणजेच मुकेश अंबानी व त्यांचे कुटुंब हे सदैव चर्चेत असते. अंबानी कुटुंबाच्या व्यवसायाचा पाया धीरूभाई अंबानी यांनी रचला होता.
-
धीरूभाई अंबानी यांचा जन्म गुजरातच्या चोरवाड या गावी झाला होता. याच गावात त्यांचे एक शतक जुने वडिलोपार्जित घर आहे. आता या घराला धीरूभाई अंबानी मेमोरियल म्हणून ओळखले जाते
-
प्राप्त माहितीनुसार अंबानी कुटुंब सुरुवातीला या घरासाठी भाडे देत होते पण २००२ मध्ये त्यांनी संपूर्ण वास्तू खरेदी करून २०११ मध्ये त्याचे मेमोरियल हाऊस मध्ये रूपांतर केले
-
याच घरात १९५५ साली धीरूभाई व कोकिलाबेन यांचा विवाह पार पडला होता व या जोडप्याने पुढे ८ वर्ष इथेच संसार केला होता.
-
१. २ एकर जमिनीत पसरलेला हा ‘अंबानींचा आशियाना’ दोन भागात विभागलेला आहे. यातील एक भाग अंबानी अद्यापही खाजगी ठेवण्यात आला आहे कारण कोकिलाबेन अजूनही इथे अधूनमधून राहण्यासाठी जात असतात.
-
तर दुसरा भाग हा सामान्य जनता व पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आपण या मेमोरियलला भेट देऊन अंबानी कुटुंबाचा इतिहास जाणून घेऊ शकता तसेच काही खास फोटो सुद्धा इथे प्रदर्शनासाठी लावण्यात आले आहेत
-
जुन्या काळातील या महालरूपी घरात वैशिष्ठ्यपूर्ण ठेवणीच्या खोल्या, किचन, व अन्यही गोष्टी पाहायला मिळतात. अंबानींच्या घरातील बारकाईने बनवण्यात आलेले फर्निचर सुद्धा इथे पाहायला मिळू शकते.
-
तसेच या मेमोरियल हाऊसमध्ये एक गिफ्ट शॉप सुद्धा आहे जिथे तुम्हाला अंबानी कुटुंबाशी संबंधित काही खास गोष्टी खरेदी करता येऊ शकतात
-
हे मेमोरियल हाऊस सोमवार वगळता संपूर्ण आठवडा सुरु असते. सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ पर्यंत आपण मेमोरियल हाऊसला भेट देऊ शकता आणि सगळ्यात खास बाब म्हणजे येथील प्रवेश फी केवळ २ रुपये ठेवण्यात आली आहे
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ