-
चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
-
सध्या ऋतुराजच्या घरी लगीनघाई पाहायला मिळत आहे.
-
नुकतंच ऋतुराजच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.
-
ऋतुराजची होणारी पत्नी उत्कर्षा पवारच्या मेहेंदी सोहळ्याचे काही फोटो समोर आले आहेत.
-
ऋतुराजने त्याच्या हातावर उत्कर्षाच्या नावाची मेहेंदी काढल्याचं फोटोत पाहायला मिळत आहे.
-
ऋतुराजच्या एका हातावर ‘ऋतुराज caught उत्कर्षा’ लिहिण्यात आले असून त्याबरोबरच लग्नाची तारीखही लिहिल्याचे पाहायला मिळत आहे.
-
तर दुसऱ्या हातावर दोघांच्याही नावाचे इंग्रजीतील पहिले अक्षर घेऊन बॅट व बॉलचं उत्कृष्ट डिझाइन काढण्यात आलं आहे.
-
ऋतुराजच्या हातावर काढलेल्या मेहेंदीच्या डिझाइनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
-
ऋतुराज व उत्कर्षाचा मेहेंदी सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला.
-
या सोहळ्याला त्यांचे नातेवाईक आणि जवळचा मित्र-परिवार उपस्थित होता.
-
उत्कर्षाने शॉर्ट वेस्टर्न ड्रेस परिधान करण्यास पसंती दिली. तर दुसरीकडे ऋतुराजने साधा सदरा, पायजमा घातला होता.
-
दरम्यान ऋतुराज आणि उत्कर्षा येत्या ३ जूनला विवाहबंधनात अडकणार आहेत. (सर्व फोटो – RuttuRAJ Era/ इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख