-
ओडिशामध्ये झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. कोरोमंडल एक्स्प्रेसचा बहानगा स्टेशनवर थांबा नसल्याने ही रेल्वे पूर्ण वेगाने धावत होती. परंतु बहानगा स्टेशनजवळून ज्या लूप लाईनवरून कोरोमंडल एक्स्प्रेस जाणार होती, तिथे आधीपासूनच एक मालगाडी उभी होती. त्यामुळेच अपघात झाला..(फोटो : रॉयटर्स)
-
कोरोमंडल एक्स्प्रेसचा अपघात इतका भीषण होता की, या रेल्वेचे २१ डबे रुळावरून घसरले आणि ३ डबे तर थेट दुसऱ्या मार्गावर जाऊन पडले. (फोटो: पीटीआय)
-
रात्रभर बचावकार्य सुरूच राहिले कामगार आणि स्थानिक लोकांनी मुतदेह बाहेर काढले, तसेच ट्रेनमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णालयात नेलं.(फोटो: पीटीआय)
-
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. (फोटो : पीटीआय)
-
दुर्घटनास्थळावरील व्हिज्युअल्समध्ये मोडलेले ट्रेनचे डबे, एकावर एक पडलेल्या, जमिनीत रुतलेल्या अवस्थेत दिसत आहेत. (फोटो: पीटीआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा त्यांच्याबरोबर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी मोदींनी कॅबिनेट मंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा करत जखमींना आणि कुटुंबीयांना आवश्यक ती मदत देण्याचे निर्देश दिले. (फोटो: पीटीआय)
-
मदतीसाठी ओडिशा सरकारने आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.(फोटो: पीटीआय)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”