-
राजस्थानचा शाही थाट आता जगभरात पसंतीला उतरत आहे. (फोटो – ट्वीटर)
-
ट्रॅव्हल सर्व्हिस कंपनी ट्रिप अॅडव्हायझरच्या मते, राजस्थानमधील जयपूरमध्ये असलेल्या रामबाग पॅलेसला जगातील सर्वात आवडते हॉटेल म्हणून निवडण्यात आले आहे. (Photo- Uniq Hotels)
-
या यादीत ३७ हॉटेल्सचा समावेश करण्यात आला असून, त्यात रामबाग पॅलेसला पहिले स्थान मिळाले आहे. हे हॉटेल सुमारे १९० वर्षे जुने आहे. त्या काळात हा राजघराण्याचा राजवाडा असायचा. (Photo – rajasthan tourism)
-
जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ रामबाग पॅलेसपासून अंदाजे ११ किलोमीटर अंतरावर आहे.(Photo-HRS)
-
तुम्ही जयपूरमध्ये टॅक्सी भाड्याने घेऊन येथे पोहोचू शकता किंवा पॅलेसमधून पिक अप अँड ड्रॉप व्यवस्था मागू शकता.
-
येथे आलेल्या पाहुण्यांना शाही वागणूक मिळते. रामबाग पॅलेसमध्ये वेगवेगळे रूम्स आहेत, येथे एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडे 30 हजारांपासून सुरू होते. (Photo – rajasthan tourism)
-
हा राजवाडा ४७ एकरात पसरलेला आहे, त्यात एक मोठी बाग, मोठा व्हरांडा आणि अनेक A वन सेवांसह आलिशान खोल्या आहेत. (Photo – rajasthan tourism)
-
रामबाग पॅलेस हा ‘ज्युवेल ऑफ जयपूर’ म्हणून ओळखला जातो. हे एकेकाळी महाराजा सवाई मानसिंग द्वितीय आणि त्यांची महाराणी गायत्री देवी यांचे निवासस्थान होते. (Photo – rajasthan tourism)
-
या हॉटेलमध्ये अनेक चित्रपटांचे शूटिंगही झाले आहे. (Photo – rajasthan tourism)
-
हा सुमारे १९० वर्षे जुना राजवाडा असून, त्याचे हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. (Photo – rajasthan tourism)
-
इंडियन हॉटेल्स कंपनीच्या अंतर्गत चालणारे हे हॉटेल ‘ज्वेल ऑफ जयपूर’ म्हणूनही ओळखले जाते. (Photo – rajasthan tourism)
-
ट्रिप अॅडव्हायझरच्या मते, जगातील ३७ आलिशान हॉटेल्सना मागे टाकून या हॉटेलने पहिले स्थान मिळवले आहे. (Photo – rajasthan tourism)
-
मालदीवच्या बॉलीफुशी बेटावर असलेले ओझेन रिझर्व्ह बॉलीफुशी हॉटेल या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, तर ब्राझीलमधील ग्रामाडो येथील कॉलिन डी फ्रान्स हॉटेल तिसऱ्या स्थानावर आहे. (Photo – rajasthan tourism)
-
-

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार