-
“चार लोक काय म्हणतील?” हे जणू आपल्या सामान्य लोकांच्या जीवनाचं ब्रीदवाक्यच आहे. आपण पदोपदी कुणा ना कुणाच्या तोंडी हे वाक्य वरचेवर ऐकतोच. सध्या याच ‘चार लोक’ या संकल्पनेवर बरीच मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. “काम असं करा की चार लोक म्हणतील…” या टॅगलाइनखाली अशी मीम्स सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यापैकीच काही मजेशीर मीम्स आपण पाहणार आहोत.
-
‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील रामधीर सिंगच्या तोंडाचा हा जबरदस्त डायलॉग पुन्हा चर्चेत आला आहे.
-
‘धमाल’ या चित्रपटाची कथादेखील अशाच संकल्पनेभोवती फिरते ही गोष्ट हे मीम पाहिल्यावर आणखी स्पष्ट होतं.
-
नवाजुद्दीनचं हे मीमदेखील प्रचंड व्हायरल होत आहे.
-
आजही कुठे ‘जेसीबी’चं काम सुरू असेल तर ‘चार’काय तर त्याहून जास्त लोक तन्मयतेने पाहताना आपल्याला बघायला मिळेल.
-
या संकल्पनेवर आधारित ‘विमल’ची अशी जाहिरात कधी पुढे मागे बघायला मिळूच शकते.
-
सध्या ‘आदिपुरुष’मुळे रामायण पुन्हा चर्चेत आहे. रामानंद सागर यांचं रामायण पाहिलेल्या लोकांना ही गोष्ट जास्त जवळची वाटेल हे नक्की.
-
ही व्हायरल मीम्स पाहून काही लोकांच्या मनात असा विचार आलाच असेल.
-
शेवटी ४ लोकच लागतात याचा तंतोतंत अर्थ असाच होतो.
-
मुंबईच्या ट्रॅफिक हवालदारांचा स्वॅगच काही निराळा, नाही का?
-
बॉडी बिल्डर लोकांच्या बाबतीत ही गोष्ट हमखास घडू शकते.
-
चित्रपटगृहात अक्षय कुमारची अशी जाहिरात पाहायला मिळाली तर कुणालाच हसू आवरणार नाही.
-
अशीही काही लोकांची प्रतिक्रिया असावी.
-
कुणा कुणाला ‘स्वर्ग’ चित्रपटातील राजेश खन्ना यांचा हा सुपरहीट डायलॉग आठवला?
-
याबद्दल काहीच बोलायला नको, फक्त मीमच धुमाकूळ घालायला पुरेसं आहे.
-
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या ४ लोकांचं आता काहीच खरं नाही.
-
हे मीम पाहून बऱ्याच लोकांची अमिताभ बच्चन यांच्यासारखीच अवस्था झाली असावी.
-
आता अगदी शेवटचं! ही चार लोक आहेत तरी कोण? हा प्रश्न ‘सीआयडी’लाही पडला आहे. (सर्व फोटो सौजन्य : सोशल मीडिया / फेसबुक)
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही