-
ठाकरे गट आणि शिंदे गटात सातत्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
-
संजय शिरसाट यांनी ठाकरे गटासह खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
-
ठाकरे गट हा गद्दार आहे. ते शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.
-
ठाकरे गटाने शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना तिलांजली दिली. बाळासाहेबांच्या विचारांना मातीत गाडलं आहे- संजय शिरसाट
-
शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जायला नको होतं, पण ते गेले- संजय शिरसाट
-
आम्ही कोणाच्या मांडीवर जाऊन बसलो नाही. ठाकरे गट शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसला. ठाकरे गट ‘सिल्व्हर ओक’ला नतमस्तक झाला आहे- संजय शिरसाट
-
यापूर्वी ‘मातोश्री’वर अमित शाह, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती पदाचे उमेदवार येत होते. आता हीच‘मातोश्री’ लोकांच्या दरवाजावर कटोरा घेऊन जातं आहे, याचं दु:ख आम्हाला होतं- संजय शिरसाट
-
ठाकरे गटाच्या या अवस्थेचे कर्ते-करविते संजय राऊतांसारखे पागल लोक आहेत- संजय शिरसाट
-
संजय राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे. या किडीमुळे उद्धव ठाकरेंचं अध:पतन झालं आहे- संजय शिरसाट

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख