-
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये रंगलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामन्यात काल चौथ्या दिवसाच्या सरतेशेवटी टीम इंडियाने शरणागती पत्करली आहे. यानंतर विराट कोहलीच्या अनेक इंस्टाग्राम पोस्ट्सची सोशल मीडियावर चर्चा होतेय.
-
WTC फायनलच्या संपूर्ण मालिकेतच कोहली चर्चेत राहिला. दुसऱ्या दिवसअखेर भारताने ५ बाद १५१ धावा केल्या होत्या. कोहलीकडून मोठ्या धावसंहयेची अपेक्षा असताना त्याचा खेळ मात्र सुमार राहिला
-
मिचेल स्टार्कच्या एका चेंडूवर तो स्लिपमध्ये झेलबाद झाला. कोहली ३१ चेंडूत १४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. लवकर आउट होण्यावर फॅन्स निराश असतानाच कोहली पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर जेवताना दिसला.
-
विराट कोहली जेवत असतानाच्या फोटोवर फॅन्सनी अगदी सडकून टीका केली होती, काहींनी तर त्याला सुनावताना तेंडुलकरचे उदाहरण सुद्धा दिले होते.
-
२००३ मध्ये लवकर बाद झाल्यावर सचिन तीन दिवस जेवला नव्हता आणि कोहलीला आउट होण्याचं काहीच पडलेलं नाही अशा पद्धतीच्या कॅप्शनसह हा फोटो शेअर होत होता.
-
ओव्हलवर तिसरा दिवस सुरू होण्यापूर्वी, विराट कोहलीने त्याच्या ट्रोल्सला प्रत्युत्तर देत मार्क मॅन्सनचा एक कोट पोस्ट केला. “इतर लोकांच्या मतांच्या तुरुंगातून स्वतःला मुक्त करण्यासाठी तुम्ही नापसंत होण्याची क्षमता विकसित केली पाहिजे” असं म्हणतात कोहलीने सडेतोड उत्तर दिले होते.
-
कोहलीची ही पोस्ट व्हायरल होताच मग पुन्हा फॅन्सनी टीकेवर घुमजाव करत, “या माणसाला समजवा आम्ही त्याच्या विरुद्ध नाही आहोत पण आमच्या अपेक्षांचा विचार करायला हवा” अशा पोस्ट केल्या होत्या.
-
दरम्यान, काल सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला हा सामना जिंकण्यासाठी २८० धावांची आवश्यकता होती आणि संघाच्या हातात सात विकेट्स होत्या.
-
परंतु, टीम इंडियाने एका पाठोपाठ एक विकेट्स गमावल्या आणि पहिल्याच सत्रात संघ २३४ धावांवर गारद झाला. आणि पुन्हा एकदा भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनण्याचे स्वप्न, स्वप्नच राहिले

‘झी मराठी’च्या नायिकेने दिली प्रेमाची कबुली; होणार ऐश्वर्या व अविनाश नारकरांची सून, ‘लग्न झालंय का?’ विचारताच म्हणाली…