-
उद्योगनगरीचा पाहुणचार घेऊन श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी पुण्याकडे मार्गस्थ झाला आहे.
-
पिंपरी-चिंचवडकरांनी भक्तिभावाने पालखीला निरोप दिला.
-
पहाटेपासूनच नागरिक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दुतर्फा थांबलेले होते. पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
-
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी सायंकाळी उद्योगनगरीत दाखल झाला होता. आकुर्डीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात दुसरा मुक्काम झाला.
-
सोमवारी पहाटे संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या उपस्थितीत मंदिरात महापूजा झाली. महापालिका आयुक्त शेखर सिंह, त्यांच्या पत्नी ईशा सिंह यांनी पादुकांचे पूजन केले. काकड आरती झाली. त्यानंतर सोहळा मार्गस्थ झाला.
-
दरम्यान, संभाजी भिडे यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सारथ्य केलं आहे.
-
भिडे गुरुजी पालखीचं सारथ्य करतानाचे फोटो व्हायरल होत आहेत.
-
पहाटेपासूनच नागरिक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दुतर्फा थांबलेले होते. खंडोबा माळ चौकातून सोहळा मुंबई-पुणे महामार्गाने पुण्याकडे निघाला.
-
साडेसातच्या सुमारास पालखी खराळवाडी येथील विठ्ठल मंदिरात सकाळच्या विसाव्यासाठी थांबली. येथे न्याहरी केल्यानंतर पालखी सोहळा पुढे निघाला. (फोटो सौजन्य-Arul Horizon)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”