-
एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
-
दर्शनाचा मित्र राहुल हांडोरे यानेच दर्शनाचा खून केला आहे.
-
आरोपी राहुल हांडोरे आणि मृत दर्शना पवार १२ जून रोजी राजगडावर फिरायला गेले होते.
-
१२ जूनपासून दर्शना आणि आरोपी राहुल हांडोरे बेपत्ता झाले.
-
यानंतर दर्शनाच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिली.
-
१८ जून रोजी दर्शनाचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला सापडला होता.
-
दर्शना पवारच्या खून प्रकरणात ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने २१ जून रोजी आरोपी राहुल हंडोरेला मुंबईतून अटक केली.
-
अटकेनंतर आरोपी राहुल हांडोरेनं पोलीस तपासात धक्कादायक खुलासे केले आहे.
-
दर्शनाने लग्नास नकार दिल्याने हत्या केल्याचं आरोपीनं सांगितलं. यावेळी त्याने हत्येचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
-
विवाहास नकार दिल्याने झालेल्या वादावादीनंतर रागाच्या भरात दर्शना पवारवर कंपासमधील कटर ब्लेडने तीन ते चार वार केले- आरोपी राहुल हांडोरे
-
कटरचा वार गळ्याला लागल्याने दर्शनाच्या गळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला- आरोपी राहुल हांडोरे
-
गळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर दर्शनाच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला, अशी कबुली आरोपी राहुल हांडोरे याने सोमवारी पोलिसांना दिली.
-
दर्शनाला मारण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्याकडून अनावधानाने हे कृत्य घडलं, असंही आरोपी राहुलने चौकशीत सांगितलं.
-
एमपीएससीच्या परीक्षेची तयारी आम्ही दोघे एकत्र करत होतो. एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी तिला मी मदत केली- आरोपी राहुल हांडोरे
-
एमपीएससी परीक्षा पास झाल्यावर दर्शनाने विवाहास नकार दिला- आरोपी राहुल हांडोरे
-
लग्नास नकार दिल्याचा राग आल्याने मी दर्शनाला संपवायचे ठरवले- आरोपी राहुल हांडोरे
-
दर्शनाची हत्या केल्यानंतर आरोपी राहुल पसार झाला होता.
-
आरोपी राहुल हंडोरे न्यायालायने गुरुवारपर्यंत (२९ जून) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
-
आरोपी राहुल हांडोरे हाही एमपीएससीची तयारी करत होता. तसेच तो डिलिव्हरी बॉयचं कामही करत होता.
-
व्हायचं होतं अधिकारी आणि झाला गुन्हेगार
-
सर्व फोटो सौजन्य/लोकसत्ता ग्राफिक्स टीम

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO