-
पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात मंगळवारी एका १९ वर्षीय विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
-
पीडितेच्याच एका पूर्व मित्राने कोयत्याने हा हल्ला केला.
-
घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही तरुणांमुळे पीडित मुलीचा जीव वाचला आहे.
-
पीडितेवर प्राथमिक उपचार करून तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
-
पोलिसांनी हल्लेखोराला अटक करून विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
-
शंतनु लक्ष्मण जाधव (वय २२) असं आरोपीचं नाव असून तो मुळशी तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवाशी आहे.
-
पुण्याचे झोन-१ चे डीसीपी संदीप सिंग गिल या हल्ल्याबाबतचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
-
पीडित विद्यार्थिनी आणि आरोपी तरुण दोघंही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते- पोलीस अधिकारी गिल
-
दोघांमध्ये चांगली मैत्री होती, पण कालांतराने त्यांच्यात काही मतभेद झाले-पोलीस अधिकारी गिल
-
दोघांमधील मैत्री पुढेही कायम ठेवण्याची मागणी आरोपीनं पीडित मुलीकडे केली. पण मुलीने आरोपीच्या मागणीला नकार दिला. यामुळे आरोपीला पीडितेचा राग आला-पोलीस अधिकारी गिल
-
दरम्यानच्या काळात पीडित मुलगी पुण्याला राहायला आली आणि ती ‘इंटेरिअर डिझाइन’चा कोर्स करू लागली-पोलीस अधिकारी गिल
-
त्यानंतर आरोपीही पुण्यात आला आणि त्याने तिचा पाठलाग सुरू केल- पोलीस अधिकारी गिल
-
त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण पीडितेनं आरोपीशी बोलण्यास नकार दिला – पोलीस अधिकारी गिल
-
याच रागातून आरोपीनं तिच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला- पोलीस अधिकारी गिल
-
आर्म अॅक्टसह आयपीसीच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे-पोलीस अधिकारी गिल

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी