-
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही समर्थक आमदारांसह बंडखोरी केली आहे.
-
अजित महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे.
-
यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
अजित पवारांच्या बंडखोरीला दोन दिवस झाले आहेत, मात्र अद्याप बंडखोरीबाबतचं चित्र स्पष्ट झालं नाही. याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
-
दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया दिली आहे.
-
अजित पवारांच्या बंडखोरीमागे बहुदा शरद पवारच असतील, अशी शक्यता राज ठाकरे यांनी वर्तवली.
-
त्यांनी अजित पवारांबरोबर गेलेल्या तीन नेत्यांवरही संशय उपस्थित केला आहे.
-
जे झालंय ते अत्यंत किळसवाणं आहे. जर तुम्ही जनमताचा कानोसा घेतला तर प्रत्येक घरात तुम्हाला शिव्या ऐकायला मिळतील. दुसरं तुम्हाला काहीही ऐकायला मिळणार नाही- राज ठाकरे
-
हा मतदारांचा घोर अपमान आहे. यावर मी भाषणात अनेकदा बोललो आहे. या सर्व गोष्टींवर सविस्तर मेळावे घेणार आहे- राज ठाकरे
-
महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टींची सुरुवात शरद पवारांनीच केली. त्यांनी १९७८ साली पुलोदचा प्रयोग केला. त्यापूर्वी महाराष्ट्रात असं कधी झालं नव्हतं- राज ठाकरे
-
या सगळ्या गोष्टींची सुरुवात शरद पवारांपासून झाली आणि शेवटही शरद पवारांकडेच झाला-राज ठाकरे
-
शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं, असं म्हणायचं आहे का? असं विचारलं असता राज ठाकरे पुढे म्हणाले, “मला असं वाटत नाही. बहुदा या सगळ्या गोष्टी त्यांनीच (शरद पवार) पेरल्या आहेत.
-
कारण प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे-पाटील आणि छगन भुजबळ ही माणसं अजित पवारांबरोबर जाणारी माणसं नाहीत-राज ठाकरे
-
मला ही तीन माणसं मला संशयास्पद वाटतात. संशयास्पद म्हणजे ती तीन माणसं अजित पवारांबरोबर जाऊन मत्रीपदं स्वीकारतील, असं वाटत नाही- राज ठाकरे
-
(सर्व फोटो सौजन्य-लोकसत्ता/इंडियन एक्स्प्रेस/फायनान्शिअल एक्स्प्रेस)
![Devendra Fadnavis Statement on Ladki Bahin Yojana](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/DF2.jpg?w=300&h=200&crop=1)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”