-
सध्या टोमॅटो हा भाजप आणि काँग्रेस पक्ष यांच्यातील राजकीय वादाचा मुद्दा बनला आहे. भारतातील काही शहरांमध्ये टोमॅटोबरोबरच ‘या’ भाज्यांच्या किमती १५० रुपये प्रति किलोच्या पुढे गेल्याचे वृत्त आहे.
-
नवी दिल्लीत बाजारात टोमॅटो १५० रुपये प्रतिकिलो विकले जात आहेत. (पीटीआय)
-
टोमॅटोच्या किमती देशभरात वाढल्या असून भारतातील अनेक भागांमध्ये किरकोळ किंमत १०० रुपये प्रति किलोच्या पुढे गेली आहे. (पीटीआय फोटो)
-
सूरतच्या बाजारात एक माणूस टोमॅटोची वर्गवारी करीत आहे. (पीटीआय फोटो)
-
भोपाळ, मध्य प्रदेशात टोमॅटो आणि इतर भाज्या, एलपीजी सिलिंडर आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींविरोधात महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. (पीटीआय फोटो)
-
चेन्नई, TN (PTI) येथे रास्त भाव दुकानातील एक कर्मचारी टोमॅटो विकत आहे.
-
चेन्नई, तामिळनाडूमधील पन्नाई पसुमाई आउटलेटमधून वाजवी किमतीच्या दुकानात टोमॅटो पाठवले जात आहेत. (पीटीआय)
-
बुधवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी वाढत्या किमती आणि बेरोजगारीवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
-
भाज्यांचे भाव खूप वाढले आहेत. टोमॅटो १५० रुपये किलोने विकला जात आहे.
-
दरवाढीमुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
-
सरकारने हस्तक्षेप करून भाज्यांचे दर नियंत्रणात आणावेत, अशी विनंती करतो,” असेही मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितलं आहे.
-
टोमॅटोचा भाव मुंबईत जानेवारी महिन्यात प्रति किलो २५ ते ३० रुपये होता. आता तो प्रति किलो १४० रुपयांवर पोहोचला आहे.
-
मॅकडोनाल्ड्स इंडियाच्या उपाहारगृहांनी बर्गरमध्ये टोमॅटोचा वापर बंद केला आहे. कंपनीने दिल्लीतील उपाहारगृहांबाहेर चिकटवलेल्या सूचना पत्रकात टॉमेटोच्या तात्पुरत्या तुटवड्याबद्दल ग्राहकांना सूचित केले आहे.
-
टोमॅटो आणि कांदा ही दोन पिके देशातील सामान्य नागरिकांशी भावनिकदृष्ट्या जोडलेली आहेत.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”