-
प्राचीन काळात शेतक-यांनी पर्जन्यसूर्य नक्षत्रांना पडणाऱ्या पावसाप्रमाणे गमतीशीर नावे दिली होती. यानुसार पुष्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘ म्हातारा पाऊस ‘ म्हणतात
-
यंदा २० जुलैला रवीने पुष्य नक्षत्रात प्रवेश घेतला असून ‘म्हातारा पाऊस’ सुरु झाला आहे, या पावसाचे वाहन बेडूक आहे.
-
ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांच्या माहितीनुसार, बेडूक वाहन असल्याने पाऊस दणकून, लहरी आणि वेडावाकडा पडणार आहे.
-
कृतिका नक्षत्रातील हर्षलमुळे हा पाऊस आणखीनच जोरदार होईल आणि वाहनांचे खूप मोठे अपघात याच कालखंडात घडलेले दिसून येणार आहेत.
-
महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या प्रदेशात, मुंबई व कोकण सह विदर्भात हा पाऊस बुध शुक्र युती योगाच्या साह्याने दणकून पडेल व मोठी पडझड या पावसामुळे होऊ शकते.
-
मुंबईसह ठाणे, कल्याण, विदर्भ, रायगड या सर्वच भागांमध्ये मागील तीन दिवसात तुफान पाऊस झाला आहे. आणि ग्रहमानानुसार येणारे काही दिवस पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
-
या पर्जन्याच्या संभाव्य तारखा २२, २३ , २६, २७, २९, ३१ जुलै व १, २ ऑगस्ट अशा आहेत. हा पाऊस वादळी स्वरूपाचा असल्याने अनेक ठिकाणी नुकसानीचे योग आहेत.
-
अगोदरच इर्शाळवाडी येथील दुर्घटना, नाल्यात बाळ वाहून गेल्याचा दुर्दैवी प्रकार व विस्कळीत वाहतूक यामुळे पावसाचे पडसाद जनसामान्यांवर उमटत आहेत, अशावेळी विनाकारण सुरक्षित ठिकाणहून बाहेर पडणे टाळावे.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल