-
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. विशेष म्हणजे तब्बल ४५ वर्षांनंतर यमुना नदीचे पाणी ताजमहाल संकुलाच्या बाहेरील भिंतीपर्यंत पोहोचले आहे.
-
त्यामुळेच १७ व्या शतकापासून अस्तित्वात असलेल्या पांढऱ्या संगमरवरी समाधीच्या मागे असलेल्या बागेत पूर आला आहे. यापूर्वी १९७८ मध्ये अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळाली होती.
-
या ऐतिहासिक वास्तूची देखभाल करणाऱ्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (एएसआय) अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुराचे पाणी स्मारकात जाण्याची शक्यता कमी आहे.
-
“सध्या आग्रा येथे यमुना नदी ४९८ फूट पातळीवरून वाहत आहे. कमी पुराची पातळी ४९५ फूट तर मध्यम पातळी ४९९ फूट आहे. येत्या काही दिवसांत पुराचे पाणी ५०० फूट ओलांडू शकते,” असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले, इंडियन एक्स्प्रेसने मंगळवारी वृत्त दिले.
-
आग्रा येथे मुसळधार पावसामुळे यमुना नदी ओसंडून वाहत असताना एक माणूस ऐतिहासिक ताजमहालाच्या समोर रस्त्याच्या कडेला उभा आहे. रॉयटर्स
-
आग्रा येथे मुसळधार पावसामुळे यमुना नदी ओसंडून वाहत असताना पर्यटक ऐतिहासिक ताजमहालच्या आत फिरत आहेत. रॉयटर्स
-
आग्रा येथे मुसळधार पावसामुळे यमुना नदी ओसंडून वाहत असल्याने लोक ऐतिहासिक ताजमहालासमोर पुराच्या पाण्याजवळ उभे आहेत. रॉयटर्स
-
आग्रा येथे मुसळधार पावसामुळे यमुना नदी ओसंडून वाहत असताना एक व्यक्ती ऐतिहासिक ताजमहालचे छायाचित्र घेत आहे. रॉयटर्स
-
फुगलेली यमुना नदी आग्रा येथील ताजमहालच्या परिघापर्यंत आली आहे. (एपी फोटो)
-
फुगलेली यमुना नदीनं आग्र्याला अक्षरशः वेढा घातला आहे. (एपी फोटो)
-
उत्तर प्रदेश स्थित आग्र्यातील ताजमहालला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले आहे. यंदा मान्सूनच्या तडाख्याने राज्यातील अनेक जिल्हे जलमय झाले आहेत.
-
यमुनेनं रौद्ररूप धारण केल्यानं ताजमहललाही पुराच्या पाण्याची भीती आहे. (Image-Freepik)

बुलढाण्यातील केस गळतीचे रहस्य उलगडले; रोजच्या आहारातील अन्न ठरतंय कारणीभूत, जाणून घ्या कारण