-
सारा खादेम इराणची बुद्धिबळ पटू आहे. तिला नुकतंच स्पेनचं नागरिकत्व मिळालं आहे.
-
सारा खादेमचा जन्म १५ ऑगस्ट १९९७ ला इराणमधल्या तेहरानमध्ये झाला. लहानपणापासूनच तिला बुद्धिबळ खेळायची गोडी लागली. तिच्या वडिलांकडून बुद्धिबळ खेळण्याचं बाळकडू घेतलं
-
साराने वयाच्या सातव्या वर्षी बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली. असाधारण प्रतिभा दाखवत तिने बुद्धिबळ खेळली. इराणमधल्या प्रसिद्ध आणि सर्वश्रेष्ठ प्रशिक्षकांनी तिला या खेळातले पुढचे धडे दिले.
-
आंतरराष्ट्रीय पातळीवर २०१२ मध्ये साराला पहिलं मोठं यश मिळालं. तिने आशियाई युवक बुद्धिबळ स्पर्धेत १६ वर्षांपेक्षा कमी गटात साराने सुवर्णपदक जिंकलं.
-
या यशानंतर साराने मागे वळून पाहिलंच नाही. २०१६, २०१९ यामध्ये आशियाई महिला बुद्धिबळ चँपियनशिप स्पर्धेत तिला उत्तुंग यश मिळालं.
-
साराची बुद्धिबळ खेळण्याची पद्धत ही अत्यंत आक्रमक आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्याची कमकुवत स्थानं काय आहेत याचं निरीक्षण सारा करते आणि आपला खेळ तसंच पुढच्या चाली ठरवते.
-
सारा बुद्धिबळात इतकी कुशाग्र असली तरीही तिच्या कारकिर्दीत अनेक आव्हानांचा आणि अडथळ्यांचाही सामना केला. अनेक पूर्वग्रहांनाही तिला सामोरं जावं लागलं.
-
साराने डिसेंबर २०२२ मध्ये कझाकिस्तान या ठिकाणी झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत हिजाब न घालता भाग घेतला होता. यानंतर इराणने तिचा निषेध केला होता. आपल्यावर काही कारवाई होऊ नये म्हणून सारा खादेम जानेवारी महिन्यातच स्पेनला गेली होती. इराणमधे साराच्या विरोधात अटक वॉरंट लागू करण्यात आलं होतं.
-
बुद्धिबळपटू सारा खादेमला स्पॅनिश नागरिकत्व देण्यात आलं आहे. स्पेन सरकारनेच या विषयीची माहिती दिली. सारा खादेमने कझाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या फिडे वर्ल्ड रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घेतला होता. यावेळी तिने हिजाब न परिधान करता खेळ खेळला. ही बाब इराणच्या इस्लामिक ड्रेसकोड नियमाच्या विरोधात होती.
-
सारा खादेम ही जेव्हा स्पेनला आली तेव्हा तिने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यावेळी तिने हे म्हटलं होतं की मला पडद्यात रहायला आवडत नाही. त्यामुळेच मी आता यापुढे हिजाब घालणार नाही असा निर्णय घेतला आहे. आपल्या आक्रमक खेळी प्रमाणेच तिने हा आक्रमक निर्णयही घेतला. आता तिला स्पेन या देशाचं नागरिकत्व मिळालं आहे.

डोंबिवलीत ‘हे’ चाललंय काय? भर दुपारी लोकलमध्ये तरुणानं नशेत काय केलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल