-
सणवार, लग्नसराई असली की सोने खरेदीचा हंगाम! लोक हौसेने सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात.
-
सोनं ही एक धातू आहे जी जगातील जवळजवळ प्रत्येक देश संचयित करू इच्छित आहे. लोक सोन्याकडे आकर्षित झाले आहेत.
-
इतकेच नव्हे तर गुंतवणूकदार सुद्धा सोन्यात गुंतवणूक करण्यास नेहमीच प्राधान्य देत असतात.
-
सोने गेल्या आठवड्यात पुन्हा महागले. सोन्याने किमतीत नवीन रेकॉर्ड तयार केलाय.
-
अशावेळी तुमच्या मनात प्रश्न येत असेल की, सोनं एवढं महाग का असतं? चला तर आज या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.
-
सोने हे जगातील सर्वाधिक पसंतीच्या धातूंपैकी एक आहे. परंतु ते खूप महाग आहेत. कारण सोन्याच्या किमतीमागे अनेक कारणे आहेत.
-
सोनं जगात कुठेही मिळू शकतं पण ते मिळणं खूप दुर्मिळ आहे. सोनं मिळवण्यासाठी सोन्याची खाण खणावी लागते आणि खाण खणायला भरपूर मनुष्यबळ आणि पैसा लागतो.
-
मग त्या सोन्याला शुद्ध करून चांगला आकार द्यावा लागतो आणि ह्या मधेही भरपूर पैसा खर्च होतो. त्यामुळे सोनं महाग होतं.
-
याशिवाय सोनं हा पिवळ्या रंगाचा चमकदार आणि अतिशय सुंदर धातू आहे. सुंदर गोष्टींची किंमत नेहमीच जास्त असते. त्यामुळे सोन्याची चमक आणि सौंदर्य हे देखील ते महाग असण्याचं एक कारण आहे.
-
सोन्याचं एक वौशिष्ट्य म्हणजे, सोन्याला गंज चढत नाही आणि सोनं हे हाताळायला सोप्प असतं आणि सोन्याला कोणताही आकार देता येतो.
-
सोन्याला प्राचीन काळापासून खूप महत्व आहे जे इतर कोणत्याही धातूला नव्हते.
-
काही धातूंना दुर्गंधी ही येते पण सोन्याला कधीच येत नाही. दिसायला हा धातू खूपच सुंदर दिसतो.
-
त्यामुळेच इतका महाग असूनही सोनं खरेदीला आजसुद्धा पसंती दिली जाते.
-
(फोटो सौजन्य : संग्रहित छायाचित्र)

लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर