-
‘दादर अभिमान गीता’च्या अभूतपूर्व यशानंतर प्रणिल आर्ट्स या निर्मिती संस्थेचा दुसरा म्युझिक व्हिडीओ येत्या २० ऑगस्टला विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्यास आता सज्ज झाला आहे.
-
‘तूच मोरया’ असे या म्युझिक व्हिडीओचे नाव असून आपल्या सर्वांची लाडकी ‘कोकण हार्टेड गर्ल’ अर्थातच अंकिता वालावलकर या म्युझिक व्हिडीओमध्ये झळकणार आहे.
-
अंकिताचा हा पहिला-वहिला म्युझिक व्हिडीओ आहे.
-
अंकिता आणि अभिनेता विशाल फाळे ही नवी जोडी या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या म्युझिक व्हिडीओचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.
-
देवाची व्याख्या आतापर्यंत एका विशिष्ट स्वरूपात आपण सर्वानी पाहिली आहे, पण देव म्हणजे निव्वळ एक आकृती नव्हे, तर त्याची विशालता ह्या भूतलावर आहे, ती पाहता आली पाहिजे.
-
आयुष्यात आपण नेहमी नकारात्मक गोष्टींचा विचार अधिक करतो त्यामुळे साहजिकच सकारात्मक दृष्टिकोन काहीसा डावलला जातो.
-
ह्याच धर्तीवर एका गावातील गरीब मराठी जोडप्याला बाप्पाचा साक्षात्कार अनोख्या पद्धतीने होतो आणि काबाडकष्ट करत असताना निराशेतून आशेचा किरण त्यांना देऊन जातो अशी या गाण्याची संकल्पना असल्याचे प्रणिल आर्ट्सचे निर्माते, दिग्दर्शक प्रणिल हातिसकर ह्यांनी सांगितले.
-
प्रणिल आर्ट्स ह्या संस्थेचे हे दुसरे पुष्प असून ह्या गाण्याचे गीतलेखन, गायन, निर्मिती, दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रणिल हातिसकर ह्यांनी एक हाती बजावली आहे.
-
‘तूच मोरया’च्या निमित्ताने सोशल मीडियावरील आघाडीची तरुणी अंकिता वालावलकर नव्या क्षेत्रात दमदार पदार्पण करत असून अंकितासाठी हा एक मोठा ब्रेक ठरणार आहे.
-
नुकताच प्रदर्शित झालेला अंकिताचा ह्या गाण्यातील लूक सोशल मीडियावर प्रचंड गाजतो आहे.
-
बाप्पाचे गाणं, त्याला गोष्टीनुरुप लाभलेली अनोखी विचारधारा, प्रणिलचे दिग्दर्शन, ताल धारायला लावणार संगीत, अंकिताचे पदार्पण, विशालची उत्तम साथ ह्यासर्व गोष्टींमुळे ह्या गाण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे यात शंका नाही.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर / इन्स्टाग्राम)

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल