-
बंगळुरू येथील SSC सेंटर आणि कॉलेजमध्ये काल पहिल्या अग्निवीर बॅचचा पासिंग आऊट सोहळा पार पडला. (एक्स्प्रेस फोटो)
-
अग्निपथ योजनेचा एक भाग म्हणून भारतीय सैन्यात भरती करण्यात आलेल्या सर्व शस्त्रास्त्र आणि सेवांमधील ७५६ अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी एका परेडचे आयोजन करण्यात आले होते. (एक्स्प्रेस फोटो)
-
लेफ्टनंट जनरल बीके रेप्सवाल, कमांडंट एएससी सेंटर अँड कॉलेज यांनी परेडचा आढावा घेतला. (एक्स्प्रेस फोटो)
-
पासिंग आऊट परेड त्यांच्या लष्करी प्रशिक्षणाचा एक भाग आहे. जे केवळ शारीरिक प्रशिक्षण प्रदान करत नाही तर अग्निवीरांच्या बौद्धिक आणि नैतिक क्षमतांमध्येही वाढ करते. (एक्स्प्रेस फोटो)
-
३१ आठवड्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर ही तुकडी उत्तीर्ण झाली. (एक्स्प्रेस फोटो)
-
शारीरिक आणि लष्करी कौशल्यांच्या प्रदर्शनाचा एक भाग म्हणून, पासिंग आऊट परेड ASC “टोर्नेडो” मोटरसायकल टीमने प्रदर्शन केले. (एक्स्प्रेस फोटो)
-
रेपस्वाल म्हणाले, ”अग्निवीरांची पहिली तुकडी ज्यांनी कठोर परिश्रम, समर्पण, उत्साह आणि तळमळीने आपले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. ही अतिशय अभिमानाची बाब आहे. हा क्षण सशस्त्र दलांच्या इतिहासाच्या सुवर्ण पानात नोंदवला जाईल यात शंका नाही. ” (एक्स्प्रेस फोटो)
-
रेपस्वाल यांनी अग्निवीरांच्या पालकांचे देशासाठी दिलेल्या योगदानाची कबुली देत कौतुक केले. (एक्स्प्रेस फोटो)
-
टॉर्नेडोने त्यांच्या धाडसीपणाचे आणि समन्वयाचे कौशल्य दाखवून प्रेक्षकांना त्यांच्या कामगिरीने थक्क केले. (एक्स्प्रेस फोटो)
-
परेडमध्ये तायक्वांदोचे प्रदर्शन करण्यात आले ज्यामध्ये स्वयं-शिस्त आणि कठीण लढाऊ प्रशिक्षणाची कौशल्ये आणि शक्तीचे प्रदर्शन करण्यात आले.(एक्स्प्रेस फोटो)
-
अंतिम कार्यक्रम एक आकर्षक शारीरिक प्रशिक्षण प्रदर्शनाद्वारे चिन्हांकित करण्यात आला. जिथे भरती झालेल्यांनी हवेत जमिनीवर झेप घेतली, त्यांच्या शारीरिक, क्रीडा क्षमता आणि मानसिक खंबीरपणाचे प्रदर्शन करून आगीच्या रिंगमधून झेप घेतली. जी भारतीय सैन्याची एक ओळख आहे. (एक्स्प्रेस फोटो)
-
अग्निपथ योजना भारत सरकारने १४ जून २०२२ रोजी घोषित केली होती. (एक्सप्रेस फोटो)
-
ही नवीन प्रणाली फक्त अधिका-यांच्या खाली असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. (जे कमीशन अधिकारी म्हणून सैन्यात सामील होत नाहीत). (एक्स्प्रेस फोटो)
-
अग्निपथ योजनेअंतर्गत, १७.५ वर्षे ते २१ वर्षे वयोगटातील इच्छुक अर्ज करण्यास पात्र आहेत. भरतीचे मानके समान राहतील आणि भरती वर्षातून दोनदा रॅलीद्वारे केली जाईल. (एक्स्प्रेस फोटो)
-
पासिंग आऊट परेडमधील अग्निवीरांना तीन वर्षांसाठी तैनात केले जाईल. (एक्स्प्रेस फोटो)

09 April Horoscope: अचानक लाभ अन् मौल्यवान वस्तूंची खरेदी, कोणत्या राशीच्या नशिबात कसे येईल सुख? वाचा बुधवारचे राशिभविष्य