-
भारतात मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळं आहेत. ऐतिहासिक वास्तू, सुंदर समुद्र किनारे, डोंगरदऱ्या, धबदबे, सुंदर नद्यांपासून ते किल्ल्यांपर्यंत फिरण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या देशांमधील लोक भारतात फिरण्यासाठी येतात.
-
तुम्हाला माहिती आहे का की भारतातच अशी काही ठिकाणं आहेत जिथे भारतीयांनाच प्रवेशबंदी आहे. परंतु, त्या ठिकाणी परदेशी पर्यटकांचं स्वागत केलं जातं. आम्ही तुम्हाला अशा ६ ठिकाणांची माहिती देणार आहोत.
-
RED Lollipop Hostel, Chennai : चेन्नईतलं लॉलीपॉप हॉस्टेल हे केवळ परदेशी पर्यटकांसाठी आहे. (Photo: RED Lollipop Hostel Chennai/Facebook)
-
Free Kasol Cafe, Kasol : हिमाचल प्रदेशमधल्या कसोल गावातील फ्री कसोल कॅभेमध्ये भारतीयांना प्रवेश बंदी आहे. येथे केवळ परदेशी पर्यटकच जाऊ शकतात. (Photo: Stefan Kaye/Facebook)
-
Foreigners Only, Goa : गोव्यातल्या ओन्ली फॉरेनर्स बीचवर भारतीयांना प्रवेश बंदी आहे. (Photo: tripadvisor.in)
-
Uno-In Hotel, Bangalore : बंगळुरू शहरातील यूनो-इन नावाच्या हॉटेलमध्ये केवळ जपानी नागरिकच जाऊ शकतात. भारतीयांना येथे नो एंट्री. (Photo: @paulolodovice/instagram)
-
Norbulingka Cafe, Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशातल्या नोरबुलिंका कॅफेमध्ये भारतीयांना प्रवेश बंदी आहे. येथे केवळ परदेशी पर्यटकच जाऊ शकतात. (Photo: Restaurant Guru)
-
North Sentinel Island, Andaman and Nicobar : आंदमान आणि निकोबार बटांवरील नॉर्थ सेंटिनल आयलँडवर आदिवासी लोक राहतात. या बेटावरील लोक इतर जगाशी संपर्क ठेवत नाहीत. या बेटावर भारतच नव्हेत तर जगातल्या कुठल्याही व्यक्तीला जाण्यास परवानगी दिली जात नाही. (Photo: @rarehistoricphotos/instagram)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन