-
मृत्यू हे एक शाश्वत सत्य आहे. जन्म घेतलेली प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी मरणारच, हे अटळ आहे.
-
जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे अंतिम संस्कार धार्मिक विधींनुसार केले जातात.
-
हिंदू धर्मात एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याला अग्नी देऊन त्याचे अंतिम संस्कार केले जातात.
-
आगीत जळल्यानंतर संपूर्ण मृतदेह राख होतो. पण, तुम्हाला माहित आहे का, शरीराचा असा एक भाग आहे जो आगीतही जळत नाही?
-
आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाची संबंधित काही तथ्य सांगणार आहोत, जे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
-
शरीरातील चरबी आणि अवयवांचा भाग वेगळा असल्याने शरीर जाळण्याची पद्धतही वेगळी असते.
-
एका रिपोर्ट्सनुसार, शरीराच्या ज्या भागाला जास्त उष्णता मिळते, तो भाग लवकर जळतो.
-
जास्त चरबी असलेले अवयव अधिक तीव्रतेने जळतात. यानंतरही शरीरात असे काही भाग असतात जे अजिबात जळत नाहीत.
-
दात हे शरीराचे ते भाग आहेत, जे आगीत जळत नाहीत. अंत्यसंस्कारानंतर जेव्हा हाडे गोळा केली जातात तेव्हा तेथे दातही सापडतात.
-
आगीचा त्यांच्यावर फारसा परिणाम होत नाही. दात हा मानवी शरीराचा सर्वात अविनाशी घटक मानला जातो.
-
याव्यतिरिक्त, बरेच लोक म्हणतात की, नखे आगीत जळत नाहीत. तथापि, ही गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली नाही.
-
हे लक्षात घेण्यासारखे आहे की सांगाडा जळल्यावर राखमध्ये बदलत नाही. (फोटो सौजन्य: संग्रहित छायाचित्र)

८ एप्रिल पंचांग: दुःख दूर होणार ते शुभ फळ मिळणार; कामदा एकादशीला भगवान विष्णू कोणत्या राशीला पावणार? वाचा राशिभविष्य