-
पाकिस्तानातून आलेली सीमा हैदर आणि भारतीय सचिन मीणा यांची प्रेमकहाणी बॉलिवूडला लाजवेल अशी आहे. म्हणूनच आता या दोघांवर चित्रपट सुद्धा येणार असल्याचे समजतेय.
-
सीमा हैदर प्रकरणात त्या दोघांइतकीच प्रसिद्ध झालेली तिसरी व्यक्ती म्हणजे सचिनची शेजारीण.
-
सचिनच्या शेजाऱ्या -पाजाऱ्यांचे अनेक इंटरव्ह्यू समोर आले असता त्यात एका महिलेच्या विधानाने सोशल मीडियाला पार वेड लावलं होतं.
-
बरोबर ओळखलंत. “लप्पु सा सचिन, झिंगूर सा लडका” असे सहज बोलून गेलेली ही महिला रातोरात सोशल मीडियावर मीम बनली. तिच्या डायलॉगची अनेकांनी कॉपी केली. काहींनी त्यात बदल करत आपली क्रिएटिव्हिटी दाखवली.
-
यशराज मुखातेने तर या महिलेच्या डायलॉगवर गाणं सुद्धा बनवलं. आता ही महिला आहे कोण असाच प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
-
खरंतर लप्पु सा सचिन फेम महिला ही सचिनची शेजारीण आहे, जी ग्रेटर नोएडा मध्ये रबूपुरा गावी राहते
-
या महिलेने मुलाखत देताना, सीमाला पाकिस्तानात पाठवलं नाही तर उद्या आमची मुलं सुद्धा पाकिस्तानातून सुना आणतील. सीमा सचिनच्या प्रेमात पडून आल्याचं खोटं सांगतेय, सचिन पुरुषच नाही” असंही म्हटलं होतं.
-
अनेकांनी या महिलेवर टीका करत हि नक्कीच सचिनची एक्स गर्लफ्रेंड असणार असं म्हटलं आहे.
-
तर काहींनी या महिलेच्या पतीला कॅमेरा समोर आणा आम्हाला तो किती सुंदर आहे हे बघायचं आहे अशीही मागणी केली आहे.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ