-
हिमाचल प्रदेशात रविवारपासून संततधार पावसाने थैमान घातलं आहे. पावसासंबंधित घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. काही मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हिमाचल प्रदेशातील पावसाची स्थिती दर्शवणारे काही फोटोज…
-
मंडीजवळ भूस्खलन झाल्यानंतर चंदीगड-मनाली महामार्ग बंद पडला. यावेळी प्रवाशांना मातीच्या ढिगाऱ्यावरून पायी चालत जावं लागलं. (पीटीआय फोटो)
-
कुल्लूमध्ये मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर बियास नदीच्या काठावर लोक उभे आहेत. (पीटीआय फोटो)
-
उत्तरेकडील हिमाचल प्रदेश राज्यातील शिमला येथे मुसळधार पावसामुळे शिमला-कालका हेरिटेज रेल्वे ट्रॅक उखडून पडला. (रॉयटर्स)
-
रुद्रप्रयाग जिल्ह्यातील मदमहेश्वर खोऱ्यात पावसामुळे अडकलेल्या लोकांची हेलिकॉप्टरद्वारे सुटका करण्यात आली. (पीटीआय फोटो)
-
जोशीमठ येथील हेलांग परिसरातील क्रशर प्लांटजवळ घर कोसळल्यानंतर NDRF आणि SDRF कर्मचारी बचाव आणि मदत कार्य करताना. (पीटीआय फोटो)
-
चमोली जिल्ह्यातील भानेरपाणी पिपळकोटीजवळील बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचा काही भाग अतिवृष्टीमुळे वाहून गेला. (पीटीआय फोटो)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच