-
जगभर सापांच्या शेकडो प्रजाती आढळतात. यातील काही प्रजाती विषारी असतात आणि काही विषारी नसतात.
-
श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी अनेक जण सापांची पूजा करतात.
-
श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते.
-
अनेक लोकांना सापाविषयीच्या गूढ रहस्यमयी कथा जाणून घ्यायला फार आवडत असतात. तर आज आम्ही तुम्हाला अशीच काही माहिती देणार आहोत.
-
आपल्याला सापाचे कान दिसत नाही, मग ते कसे ऐकतात? याचा कधी तुम्ही विचार केलाय का? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
-
सापांचे कान सामान्य प्राण्यांसारखे नसतात. सापांना बाहेरून स्पष्टपणे न दिसणारे शरीराच्या अंतर्गत कान असतात.
-
शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, साप बहिरे नसतात. पण त्यांची ऐकण्याची क्षमता इतर शारीरिक अवयव जसं की नाक आणि डोळ्यांमुळे कमी होते.
-
सापांच्या शरीरात एक छोटेसे हाड असते. हे हाड जबड्याच्या हाडाला कानाच्या अंतर्गत भागासोबत जोडते. कोणत्याही ध्वनीचे आकलन सापांना त्यांच्या त्वचेच्या माध्यमातून होते.
-
सापांच्या अंतर्गत कानांच्या माध्यमातून साप आवाज ऐकू शकतात. आंतरीक कान असल्यामुळे सापांची ऐकण्याची क्षमता फारच कमी असते. ते २०० ते ३०० हट्सचे आवाज ऐकू शकतात.
-
साप आपली जीभ बाहेर काढून हवेत एकडे-तिकडे फिरवतात. पण या जिभेचं काम काय असतं, माहिती आहे का?
-
साप जीभेने वास घेतात. त्यामुळे ते जीभ बाहेर काढून आसपासच्या प्राण्यांचा अंदाज घेत असतात. हालचाल होत असल्यास त्यांच्या कंपनातूनही ते सभोवताली कोणी असल्याचे जाणून घेतात.
-
वरील सर्व माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे. (फोटो सौजन्य: संग्रहित छायाचित्र)

Waqf Amendment Bill: वक्फ दुरूस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूर, पंतप्रधानांची मतदानाला दांडी