-
अजित पवार यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे.
-
अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा होती.
-
यानंतर अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याने ते सत्तेत सामील झाले, असंही बोललं जात होतं.
-
दरम्यान, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मनातील मुख्यमंत्र्याबाबत खुलासा केला आहे.
-
तिन्ही नेत्यांनी नुकतंच ‘पुढारी’ वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे.
-
यावेळी तिन्ही नेत्यांना मनातील मुख्यमंत्री कोण? अशी विचारणा करण्यात आली.
-
यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जे सध्या मुख्यमंत्री आहेत. तेच मनातील मुख्यमंत्री आहेत. ते आमच्या मनाच्या बाहेरचे मुख्यमंत्री नाहीत. तेच आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत.
-
अजित पवार म्हणाले, “सरकारमध्ये जात असताना आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील. हे सांगितल्यावरच आम्ही सरकारमध्ये गेलो. त्यामुळे तेच मनातील मुख्यमंत्री असतील.”
-
मनातील मुख्यमंत्र्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी मिश्किल विधान केलं. “या दोघांनी सांगितल्यावर मी काय सांगू …”, असं शिंदे म्हणाले.

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”