-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्नेहा वाघला ओळखले जाते.
-
स्नेहा सध्या कलर्स वाहिनीवरील ‘नीरजा- एक नई पहचान’ या मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेत स्नेहा ‘प्रतिमा’ची भूमिका साकारत आहे.
-
नुकतीच स्नेहाने ओडिशामधील कोणार्कच्या सूर्य मंदिराला भेट दिली.
-
या सूर्य मंदिर परिसरातील काही फोटो स्नेहाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
तेराव्या शतकात नरसिंग राजाने ओडिशामध्ये जगप्रसिद्ध कोणार्क सूर्यमंदिर बांधले.
-
जागतिक वारसा यादीतील वास्तू म्हणून दर्जा मिळाला आहे.
-
हे मंदिर म्हणजे स्वर्गात जाणारा सूर्यदेवाचा सात घोड्यांचा रथ असून त्यास २४ चाके आहेत.
-
रोज उगवत्या सूर्याची किरणे मंदिरातील सूर्यदेवाच्या पायांवर प्रथम पडतात.
-
अतिशय उत्तम कोरीवकाम केले असून नानाविध मानवी शिल्पे मंदिरावर कोरली आहेत.
-
मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी सिंहमुखी हत्ती विशाल चबुतऱ्यावर बसलेल्या स्थितीत आहे.
-
सूर्यमंदिराच्या पूर्वेला चंद्रभागा समुद्रकिनारा आहे.
-
हे मंदिर बांधण्यासाठी त्याकाळी १२०० मजूर बारा वर्षे काम करत होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्नेहा वाघ / इन्स्टाग्राम)

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल