-
अलीकडेच अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास ४० आमदार अजित पवारांबरोबर असल्याचं बोललं जात आहे.
-
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर आमदार रोहित पवार हे शरद पवार गटाची भूमिका प्रखरपणे मांडताना दिसत आहे.
-
शरद पवार गटाची भूमिका मांडण्यासाठी ते पहिल्या फळीतील नेत्याची भूमिका पार पाडत आहेत. सरकारवर टीका करताना त्यांच्या शब्दाची धारही वाढली आहे.
-
‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार यांनी अजित पवारांविरोधात संघर्ष करण्याबाबत थेट विधान केलं आहे.
-
मी अजित पवारांचा पुतण्या आहे. दादांबद्दल आदर आहे का? असं तुम्ही मला विचारलं तर व्यक्तिगत स्तरावर काका म्हणून मला त्यांचा आदर आहेच-रोहित पवार
-
पण त्यांनी आज जी राजकीय विचारसरणी निवडली आहे किंवा ते ज्या भाजपाच्या प्रतिगामी विचारसरणीबरोबर गेले आहेत. तो विचार मला आवडत नाही- रोहित पवार
-
अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्याने राजकीय दृष्टीकोनातून संघर्ष नक्कीच होणार आहे- रोहित पवार
-
भाजपाबरोबर जाण्याआधी अजित पवारांनी ऑफर दिली होती का? यावर रोहित पवारांनी भाष्य केलं.
-
माझी भूमिका इतकी स्पष्ट आहे की त्यांनी (अजित पवार) मला विचारलंच नाही, असं रोहित पवार म्हणाले.
-
“वय झालंय, कुठेतरी थांबायला पाहिजे”, हे अजित पवारांनी शरद पवारांना उद्देशून केलेलं विधान मला आवडलं नाही- रोहित पवार
-
शरद पवारांच्या वयावरून केलेलं वक्तव्य स्वत: अजित पवारांनाही आवडलं नसावं- रोहित पवार (सर्व फोटो सौजन्य/लोकसत्ता)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”