-
राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यापासून शिंदे गट आणि भाजपाचे काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे.
-
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे.
-
सरकारमधील नेत्यांमध्ये आपसात अनेक भानगडी आहेत. जसं आता देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना चपराकच मारली आहे- एकनाथ खडसे
-
अजित पवारांचे अधिकार काढून घेतल्यासारखंच झालं आहे. अजित पवारांच्या अधिकारांवर मर्यादा आल्या आहेत- एकनाथ खडसे
-
मी अर्थमंत्री म्हणून काम केलं आहे. अर्थमंत्री म्हणून मला माझे अधिकार माहीत होते- एकनाथ खडसे
-
अजित पवारांनी अर्थमंत्री म्हणून जे अधिकार दिले आहेत, त्यावर आता फडणवीसांचं नियंत्रण राहील, अशी स्थिती आहे- एकनाथ खडसे
-
म्हणजेच यापुढे अजित पवारांची प्रत्येक फाईल आधी देवेंद्र फडणवीसांकडे जाईल, मग मुख्यमंत्र्यांकडे जाईल- एकनाथ खडसे
-
पूर्वी वित्तमंत्र्यांची फाईल थेट मुख्यमंत्र्यांकडे जावी, असा नियम आहे- एकनाथ खडसे
-
पण सध्या फडणवीस हे दुसरे मुख्यमंत्री आहेत. ते सिनिअर उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ज्युनिअर उपमुख्यमंत्र्यावर (अजित पवार) वचक ठेवण्यासाठी सिनिअर उपमुख्यमंत्र्यांची सही लागेल. म्हणजे एकप्रकारे अजित पवारांची मानहानी करण्याचा हा प्रयत्न आहे- एकनाथ खडसे

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…