-
साप असा प्राणी आहे ज्याला समोर बघून सर्वांना घाम सुटतो.
-
सापाची भिती इतकी जास्त असते की लोक सापाच्या नावानेच घाबरतात.
-
घरांमध्ये कुत्रा, मांजर, पोपट इत्यादी प्राणी पाळले जातात, तसे एक गाव आहे, जिथे प्रत्येक घरात साप पाळले जातात.
-
एवढेच नाही तर या गावातील मुले सापांसोबत खेळतात. तसेच सापाला आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सांभाळतात.
-
इतकंच नाही तर काही घरांमध्ये कोब्राही पाळले जातात. आश्चर्याची बाब म्हणजे, या गावात आजपर्यंत एकाही व्यक्तीला साप चावला नाही.
-
आपण ज्या गावाबद्दल बोलत आहोत ते महाराष्ट्रातील आहे.
-
महाराष्ट्रातील या गावाचे नाव शेतपाळ असून ते सोलापूर जिल्ह्यात आहे.
-
तुम्ही या गावात गेलात तर तुम्हाला येथील मुलं सापाशी खेळताना दिसतील.
-
हे साप त्यांना इजा करू शकत नाहीत, असा येथील लोकांचा समज आहे. यामुळेच लहान मुलांनाही त्यांच्यासोबत खेळू दिलं जातं.
-
या गावाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे पुरातन काळापासून सापांची पूजा केली जाते. त्यामुळेच गावातील प्रत्येक घरात सापांना खूप महत्त्व आहे.
-
या गावात पाळीव प्राण्यांप्रमाणे साप घरात फिरत असतात. यासोबतच घरात सापांना राहण्यासाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे. ही जागा घराच्या छतावर बांधलेली आहे, याला देवस्थान म्हणतात.
-
आपल्या अनोख्या छंदामुळे हे गावकरी आता जगभरात लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळेच आता या गावात दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. (फोटो सौजन्य : संग्रहित छायाचित्र )
पिंपरी-चिंचवड अन् भोवतालच्या पाच किलोमीटर परिसरातील शेकडो गृहप्रकल्प अडचणीत