-
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सध्या निद्रावस्थेत असलेल्या विक्रम लँडरची त्रिमितीय (थ्रीडी) प्रतिमा भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) मंगळवारी जारी केली आहे.
-
विक्रम लँडरचा हा फोटो प्रज्ञान रोव्हरने टिपला आहे.
-
लँडरपासून १५ मीटर दूर म्हणजेच ४० फुटांवरून हा फोटो टिपला आहे.
-
अॅनाग्लिफ तंत्राने ही प्रतिमा तयार करण्यात आली.
-
स्टीरिओ किंवा बहूदृश्य प्रतिमांतून एखादी वस्तू किंवा पृष्ठभाग तिन्ही मितींतून पाहण्याचे हे तंत्र आहे.
-
विक्रम लँडर हा भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेचा घटक आहे.
-
चंद्रावर १४ दिवस रात्र (गडद अंधार) आणि १४ दिवस उजेड असतो.
-
आता २२ सप्टेंबपर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्र असेल.
-
दक्षिण ध्रुवावर रात्रीच्या वेळी तापमान उणे १०० अंश सेल्सिअसपर्यंत खाली येते.
-
(सर्व फोटो सौजन्य : भारतीय अंतराळ संशोधन संस्था / ट्विटर)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”