-
भारताची राजधानी दिल्लीत येत्या शनिवारी व रविवारी (९-१० सप्टेंबर) जी-२० शिखर परिषदेचं आयोजन केलं आहे.
-
या परिषदेला जगभरातील अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
-
अगदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेनही उपस्थित राहणार आहेत.
-
जी-२० परिषदेच्या निमित्ताने पाहुण्यांच्या स्वागतासाठी भारताकडून जोरदार तयारी केली जात आहे. ही तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.
-
जगभरातील प्रमुख नेत्यांच्या पाहुणचारात कोणत्याही प्रकारची कमतरता भासली नाही पाहिजे, यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहे.
-
जी-२० शिखर परिषदेसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना चांदी आणि सोन्याच्या भांड्यात जेवण वाढलं जाणार आहे.
-
खास कारागिरांकडून भारतीय संस्कृतीप्रमाणे ही भांडी तयार करून घेतली आहे.
-
जी-२० परिषदेतील प्रतिनिधींसाठी ८ ते १० सप्टेंबर या कालावधीत दुपार आणि रात्रीच्या जेवणाचं नियोजन करण्यात आलं आहे. या प्रतिनिधींना सोन्या-चांदीच्या ताटात जेवण वाढलं जाणार आहे.
-
ही सोन्या-चांदीच्या धातूने मढवलेली आलिशान भांडी आहेत.
-
सर्व फोटो सौजन्य-screengrab/ANI

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख