-
मोरोक्कोमधील चौथ्या क्रमांकाचं मोठे शहर असलेल्या माराकेशला शुक्रवारी (९ सप्टेंबर) रात्री प्रलयकारी भूकंपाचा धक्का बसला. यात आतापर्यंत दोन हजाराहून अधिक नागरिक ठार झाले असून, अॅटलास पर्वतराजीतील खेड्यांपासून माराकेशच्या ऐतिहासिक शहरापर्यंत अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.(PC : Reuters)
-
६.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसलेल्या दुर्गम भागात पोहोचण्याचे प्रयत्न बचावकार्यातील स्वयंसेवक करत असून, भूकंपबळींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. (PC : Reuters)
-
भूकंपाचे केंद्र अल हौज प्रांतातील माराकेशच्या दक्षिणेस सुमारे ७० किलोमीटर (४४ मैल) अॅटलास पर्वतावर होतं. हा प्रदेश मुख्यत्वे ग्रामीण आहे, लाल-खडकाळ प्रदेश, पर्वत आणि नयनरम्य घाट, झरे आणि अनेक तलाव असलेला हा प्रदेश निसर्गरम्य आहे. (PC : Reuters)
-
रविवारी संध्याकाळपर्यंत मोरोक्कोत २,१२२ मृत्यूंची नोंद झाली आहे. मोरोक्कोच्या २०१४ च्या जनगणनेनुसार अल हौज प्रांताची लोकसंख्या ५.७० लाख इतकी आहे. (PC : Reuters)
-
मोठ्या प्रमाणात ग्रामीण वस्ती असलेल्या या भागात भूंकपाचे धक्के बसले आहेत. येथील लोक अरबी आणि मोरोक्कोच्या स्थानिक भाषेत बोलतात. (PC : Reuters)
-
भूकंपानंतर मदतीसाठी सरकारने बचाव पथकं आणि सैन्यदलाला पाचारण केलं आहे. (PC : Reuters)
-
भूकंपात अनेक गावं भुईसपाट झाली आहेत, अनेक इमारती ढासळल्या असून मलब्याखाली अजूनही काही लोकांचे मृतदेह असतील असं सांगितलं जात आहे. (PC : Reuters)
-
स्पेन, कतार, ब्रिटन आणि संयुक्त अरब अमिराती या देशांनी त्यांची बचाव पथकं मोरोक्कोला पाठवली आहेत. (PC : Reuters)
-
गेल्या ६० वर्षांत मोरोक्कोने असा भूकंप पाहिलेला नाही. भूकंप झाला तेव्हा जागे झालेले लोक भीतीने रस्त्यांवर धावू लागले. त्यानंतर उशिरा रात्री माराकेशच्या रस्त्यांवर अनेक जण गोळा झाले असून, अद्यापही अस्थिर असलेल्या इमारतींच्या आत जाण्यास घाबरत आहेत, अशी दृश्ये सरकारी दूरचित्रवाहिनीने दाखवली. (PC : Reuters)
-
माराकेशमधील बाराव्या शतकात बांधल्या गेलेल्या प्रसिद्ध कौतोबिया मशिदीचे नुकसान झाले आहे, मात्र त्याचे प्रमाण किती हे अद्याप कळू शकले नाही. (PC : Reuters)
-
मोरोक्कन लोकांनी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या जुन्या शहराभोवती असलेल्या प्रसिद्ध लाल भिंतींच्या काही भागांचे नुकसान दर्शविणारे व्हिडिओ देखील पोस्ट केले. (PC : Reuters)

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”