-
जगातलं चौथं मोठं रेल्वेचं जाळं भारतात पसरलेलं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे पोहोचली आहे.
-
भारतात जवळपास ७ हजारहून अधिक रेल्वे स्टेशन आहेत. या स्थानकातून २० हजारांपेक्षा अधिक रेल्वे निघतात.
-
IBEF.ORG च्या अहवालानुसार भारतात एकूण २२ हजार ५९३ रेल्वे धावतात. यामध्ये ९ हजार १४१ मालगाड्यांचा समावेश आहे.
-
पण तुम्ही कधी लक्ष दिले आहे का, प्रत्येक स्टेशनवर त्या स्थानकाचे नावं पिवळ्या पाटीवर काळ्या अक्षरातच का लिहल्या जाते?
-
तसेच रेल्वे स्टेशनवरील इतर दिशा निर्देशही पिवळ्या पाटीवर काळ्या अक्षरात का लिहण्यात येतात?
-
लाल, हिरवा, निळा,पांढरा, गुलाबी असे अनेक भडक रंग आहेत, मग पिवळाच रंग का निवडलाय, तुम्हाला माहिती आहे का..?
-
खरतंर ही अंधश्रध्दा नसून एक विज्ञान आहे. चला तर जाणून घेऊया यामागचं कारण काय?
-
पिवळा रंग तुम्हाला दूरनही आकर्षित करतो. तसेच पिवळा रंग डोळ्यांना सुखावणारा असतो.
-
लोको पायलटला दिवस आणि रात्री दोन्ही वेळा चमकदार पिवळा रंग स्पष्टपणे दिसतो.
-
त्यामुळे चालकाला स्टेशनचे नाव दूरुनच दिसते आणि त्याला थांबण्याचे सिग्नल मिळते.
-
पिवळा रंग डोळ्यांना त्रासदायक नसल्याने डोळ्यांना सुखावणारा असतो. त्यामुळे अंत्यत गर्दीच्या स्थानकावरही प्रवाशांना निर्देश फलक पाहणे सोपे जाते.
-
याचाच अर्थ इतर कोणत्याही रंगाच्या तुलनेत हा रंग लांबून सहज पाहता येतो. त्यामुळे रेल्वे स्टेशनचे नाव लिहण्यासाठी पिवळ्या रंगाच्या पाटीचा वापर केला जातो. (Photos : Indian Express)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं