-
शिवसेनेत फूट पडून जवळपास दीड वर्षे पूर्ण झाली आहेत. अद्याप शिवसेनेतील सत्तासंघर्षाचा पेच कायम आहे.
-
१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण करून निर्णय दिला आहे. संबंधित निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं.
-
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशानंतरही विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही.
-
यामुळे ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभु यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी पार पडली.
-
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना फटकारलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी एका आठवड्याच्या आत १६ आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सुरू करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
-
या सर्व घडामोडींदरम्यान, सर्वोच्च न्यायलयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सूचक विधान केलं आहे. उद्धव ठाकरे यांना अजूनही पक्षनाव आणि चिन्ह मिळू शकतं, असं सूचक विधान वकील सिद्धार्थ शिंदे यांनी केलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
-
फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली- वकील सिद्धार्थ शिंदे
-
उद्धव ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात जाणं अपेक्षित होतं, पण ते थेट सर्वोच्च न्यायालयात आले. न्यायालयाने त्यांची दखल घेतली पण निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिली नाही-वकील सिद्धार्थ शिंदे
-
आता त्यावरील कार्यवाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाच्या विरुद्धही निर्णय देऊ शकतं-वकील सिद्धार्थ शिंदे
-
अजूनही पक्ष आणि पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंना मिळू शकतं. यावर सर्वोच्च न्यायालय विश्लेषण करून निर्णय देईल-वकील सिद्धार्थ शिंदे
-
हे प्रकरण कधी ऐकलं जाईल? आणि कधी निर्णय येईल? याची वेळ मर्यादा आपल्याला सांगता येणार नाही,अशी सूचक प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली.
-
सर्व फोटो सौजन्य-लोकसत्ता ग्राफिक्स टीम
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख