-
मराठा समुदायाला आरक्षण देण्याचं आश्वासन सरकारने दिल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.
-
मागील काही दिवसांपासून ते छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेत होते.
-
आता एका वेगळ्याच कारणामुळे मनोज जरांगे चर्चेत आले आहेत. जरांगे यांना नेमक्या किडन्या किती आहेत? यावरून चर्चा सुरू झाली आहे.
-
याबाबतचा एक किस्सा स्वत: जरांगे यांनीच सांगितला आहे.
-
खरं तर, मनोज जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना एका डॉक्टराने त्यांची तपासणी केली.
-
संबंधित डॉक्टराने जरांगे यांना एकच किडनी असल्याचं सांगितलं.
-
पण त्यानंतर अन्य एका डॉक्टरांनी जेव्हा पूर्ण तपासणी केली, तेव्हा जरांगे यांना दोन किडन्या असल्याचं निष्पन्न झालं. याबाबतचा किस्सा जरांगे यांनी सांगितला आहे.
-
एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “आता माझी प्रकृती एकदम चांगली आहे. डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या असून मी एकदम तंदुरुस्त झालो आहे. आता मी पुन्हा मराठ्यांना न्याय द्यायला चाललो आहे.”
-
तुम्हाला काय झालं होतं? असा प्रश्न विचारला असता मनोज जरांगे यांनी विनोदी पद्धतीने उत्तर दिलं.
-
मला कशाचं काय झालंय? तिथे कुणीतरी डॉक्टर आला, त्याने मला तपासलं आणि म्हणाला तुम्हाला एकच किडनी आहे- मनोज जरांगे पाटील
-
पण मला एकच किडनी असती तर मग मी ३५ उपोषणं कशी केली असती- मनोज जरांगे पाटील
-
मग दुसरे डॉक्टर आले, मी त्यांना म्हटलं आधी माझ्या किडन्या तपासा मग बाकीचं बघू… त्यानंतर मला दोन किडन्या असल्याचं निष्पन्न झालं- मनोज जरांगे पाटील
-
मला आता त्या डॉक्टरचा चेहरा आठवत नाहीये. त्याने गोंधळात मला एकच किडनी असल्याचं सांगितलं होतं- मनोज जरांगे पाटील
-
आता तो डॉक्टरच होता का? हाच मला मोठा प्रश्न पडला आहे. पण माझं सर्व शरीर तपासून झालं आहे. मी आता एकदम तंदुरुस्त आहे- मनोज जरांगे पाटील
-
सर्व फोटो सौजन्य-लोकसत्ता
‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…