-
देशातीलच नाही तर आशियातील सर्वात मोठे श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची उद्योग जगतात नेहमीच चर्चा असते.
-
मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी आणि अंबानी कुटुंबाची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते.
-
जगातील सर्वात महागड्या घरात अंबानी कुटुंब राहतं.
-
मुकेश अंबानी यांचे मुंबईतील घर ‘अँटिलिया’ (Antilia) नेहमीच चर्चेत असते.
-
मुकेश अंबानींच्या अँटिलिया या घराच्या फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.
-
सगळ्यांनाच मुकेश अंबानी यांचे हे सर्वात महागडे घर आतून कसं दिसतं? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली असते.
-
सोशल मीडियावरही असे फोटोज व्हायरल झालेले लोकांना पाहायला आवडतात आणि आवर्जून त्यांच्या घराच्या आतील फोटोही पाहायला आवडतात.
-
पण तुम्हाला माहिती आहे का, मुकेश अंबानींनी त्यांच्या घराचे नाव ‘अँटिलिया’ का ठेवले आणि त्याचा अर्थ काय आहे…? चला तर आज आपण जाणून घेऊया.
-
‘अँटिलिया’हे त्यांचे निवासस्थान जगभरातील लोकांचे आकर्षण आहे. अटलांटिक महासागरातील एका पौराणिक बेटावरून याला ‘अँटिलिया’ असे नाव देण्यात आल्याचे सांगितले जाते.
-
‘अँटिलिया’ हा पोर्तुगीज शब्द ‘अँटे इलाहा’ या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ ‘आइलैंड आॅफ द अदर’ आणि ‘अपोजिट आॅफ आइलैंड’ होतो, अशी माहिती आहे.
-
मुकेश अंबानी यांचे घर अँटिलिया हे एखाद्या महालापेक्षा कमी नाही आणि ते जगातील सर्वात महागडे खाजगी घर आहे. हे घर मुंबईतील ऑफ पेडर रोडवर बांधले आहे.
-
मुंबईस्थित अँटिलिया २७ मजली असून हे तब्बल ४ लाख स्क्वेअर फूटमध्ये बांधले आहे. या घराचे बांधकाम ऑस्ट्रेलियातील कंपनीने केले असल्याची माहिती आहे. (फोटो सौजन्य : financialexpress)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”