-
मराठा समुदायाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मागील काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत.
-
मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलं.
-
४० दिवसांत सरकारने मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास पुन्हा उपोषण सुरू करणार असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
-
दरम्यान, पुण्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कायदेतज्ज्ञांची बैठक झाली.
-
या बैठकीत आंदोलनापेक्षा कायदेशीर लढाईवर भर दिला पाहिजे. आंदोलनामुळे तरुणांचं नुकसान होतंय, असा सूर उमटला.
-
या बैठकीवर आणि मराठा समाजाच्या कायदेशीर लढाईवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली.
-
आमचं नुकसान व्हायचं राहिलं आहे का? असा सवाल जरांगे यांनी विचारला.
-
कायदेशीर लढाई लढू नका, असं आम्ही म्हणत नाही. गायकवाड यांनी कायदेशीर लढाई लढली. राणेसाहेबांच्या समितीनेही कायदेशीर बाजू लढवली-मनोज जरांगे
-
कायद्याने आम्हाला काहीच मिळालं नाही-मनोज जरांगे
-
कायद्याने आम्हाला प्रत्येकवेळी हुलकावणी दिली आहे-मनोज जरांगे
-
मराठा आरक्षणासाठी न्यायालयात गेलो तर आमच्या दोन-चार पिढ्या जातील. अन् इकडे आमचा संपूर्ण कार्यक्रम होईल-मनोज जरांगे
-
कायदेशीर लढाई सुरूच राहावी, आम्ही कायद्याला मानत नाही, असं नाही -मनोज जरांगे
-
पण २००४ च्या जीआरनुसार मराठा कुणबी आहेत, हे सिद्ध केलं आहे. संत-महंतांपासूनचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत-मनोज जरांगे
-
तरीही तुम्हाला आणखी अभ्यासच करायचा आहे, तो तुम्ही करत राहा-मनोज जरांगे
-
सर्व फोटो सौजन्य-लोकसत्ता

India beats Pakistan Video: पाकिस्तानी युवतीचा त्रागा; म्हणाली, “हरलात ते ठीक आहे, पण त्या कोहलीचं शतक…”!