-
वकील गुणरत्न सदावर्ते नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांवर त्यांनी अनकेदा टीका केली आहे.
-
काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून शरद पवार यांच्या निवासस्थानी दगडफेक करण्यात आली होती. ही दगडफेक वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप आहे.
-
हे प्रकरण चर्चेत असताना आता गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.
-
एसटी कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
-
दिवाळीच्या चार दिवस आधी माझ्या कष्टकऱ्यांचं विलिनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करावा -गुणरत्न सदावर्ते
-
यामध्ये अजित पवारांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला किंवा अर्थखातं आहे म्हणून शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला, तर दिवाळीच्या चार दिवस आधी माझा एसटी कर्मचारी स्टेरिंगवर बसणार नाहीत-गुणरत्न सदावर्ते
-
ते गाडी चालवू शकणार नाहीत, असं माझं सरकारला सांगणं आहे -गुणरत्न सदावर्ते
-
जनसंघाच्या ताकदीपुढे शरद पवार चिल्लर आहेत, अशी टीका सदावर्ते यांनी केली. यवतमाळ येथील कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी ही टीका केली.
-
जनसंघ दोनच संघ मान्य करतंय. एक भगवान गौतम बुद्धांचा संघ आणि दुसरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. हे दोन्ही संघ वैचारिकदृष्ट्या सुदृढ आहेत.
-
जनसंघाच्या ताकदीपुढे शरद पवारही चिल्लर आहेत.
-
सर्व फोटो सौजन्य- लोकसत्ता
IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?