-
जगात १९५ देश आहेत, त्यापैकी १९३ राष्ट्रांना संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिली आहे. पण याशिवाय जगात अशी अनेक छोटी बेटे आहेत जी स्वतःला एक देश मानतात. या बेटांचा आकार म्हणजे क्षेत्रफळ तुमच्या परिसरापेक्षा लहान असू शकतं. परंतु, आज आम्ही तुम्हाला एका अशा देशाबद्दल सांगणार आहोत जो जगातील सर्वात लहान देशच नाही तर या देशाची लोकसंख्या जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. (PC : @sealandgov/instagram)
-
या देशाचे नाव ‘सीलँड’ आहे. हा देश इंग्लंडमधील सफोक बीचपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर आहे. हा देश एका गडावर वसलेला आहे जो गड आता मोडकळीस आला आहे. (PC : @sealandgov/instagram)
-
हा किल्ला दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटनने विमानविरोधी संरक्षणात्मक तोफा ठेवण्यासाठी प्लॅटफॉर्म म्हणून बांधला होता, जो नंतर रिकामा करण्यात आला. उध्वस्त झालेल्या या किल्ल्याला रफ फोर्ट असेही म्हणतात. (PC : @sealandgov/instagram)
-
किल्ला रिकामा झाल्यानंतर तो अनेकांनी ताब्यात घेतला होता. १९६७ मध्ये रॉय बेट्स नावाच्या मेजरने त्याचा ताबा घेतला आणि ते आपल्या कुटुंबासह येथे राहू लागले. (PC : @sealandgov/instagram)
-
९ ऑक्टोबर २०१२ रोजी रॉय बेट्सच्या मृत्यूनंतर, त्यांचा मुलगा मायकल रॉय बेट्स याने स्वतःला या देशाचा राजकुमार घोषित केले. (PC : @sealandgov/instagram)
-
हा देश ४००० चौरस मीटर क्षेत्रफळावर वसलेला आहे. या किल्ल्याला एक देश म्हणून कधीही आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली नाही. पण तरीही ते स्वतःला वेगळे राष्ट्र मानतात. (PC : @sealandgov/instagram)
-
या देशाचे स्वतःचे संविधान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, पासपोर्ट आणि चलन देखील आहे. या देशाची खास गोष्ट म्हणजे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. (PC : @sealandgov/instagram)
-
२००२ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार येथील एकूण लोकसंख्या 27 आहे. परंतु येथे उपजीविकेचे कोणतेही साधन नसल्यामुळे लोक इतर देशांत राहत आहेत. २०१५ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार या देशात फक्त २ लोक राहतात. (PC: @sealandgov/instagram)
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही