-
भारतातील सेमी-हाय स्पीड ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेसबाबत नवीन माहिती समोर आली आहे. (Image Credit- @dailytravelhac1/instagram)
-
रेल्वे मंत्रालयाने नुकतेच वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या डिझाइनला अंतिम स्वरूप दिले आहे. (Image Credit- @dailytravelhac1/instagram)
-
स्लीपर वंदे भारत ट्रेनचा फर्स्ट लुकही समोर आला आहे. स्लीपर ट्रेन आतून कशी दिसेल याचे काही अॅनिमेटेड फोटोज समोर आले आहेत. (Image Credit- @dailytravelhac1/instagram)
-
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये २० ते २२ डबे असणार आहेत. (Image Credit- @dailytravelhac1/instagram)
-
स्लीपर ट्रेनमधील २० ते २२ डब्यांमध्ये ८५७ बर्थ असतील. ज्यातील ८२३ प्रवाशांसाठी आणि ३४ कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतील. (Image Credit- @dailytravelhac1/instagram)
-
प्रत्येक कोचमध्ये लहानशी पॅन्ट्री देखील असणार आहे. तसेच यात वाय-फाय आणि एलईडी स्क्रीनची सुविधा देण्यात येणार आहे जे प्रवाशांना फायदेशीर ठरणार आहे. (Image Credit- @dailytravelhac1/instagram)
-
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. (Image Credit- @dailytravelhac1/instagram)
-
उपलब्ध माहितीनुसार, या स्लीपर ट्रेनचे कोच हे चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) मध्ये तयार केले जातील. (Image Credit-PTI)
-
वंदे भारत स्लीपर ट्रेन फेब्रुवारी २०२४ पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. (Image Credit-Loksatta)