-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही रॅपिड फायर प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. यात आवडत्या गाण्यापासून ते आवडतं ठिकाण, आवडता दादा, आवडत्या वहिनी याचंही त्यांनी उत्तर दिलंय.
-
महाराष्ट्रातील आवडतं ठिकाण कोणतं? सुप्रिया सुळेंनी अजिंठा नाव घेतलं.
-
आवडता सिनेमा विचारल्यावर सुप्रियांनी मुघल-ए-आजम सिनेमाचं नाव घेतलं.
-
आवडतं मराठी गाणं विचारल्यावर ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे आवडतं गाणं असल्याचं त्या म्हणाल्या.
-
आवडतं हिंदी गाणं विचारल्यावर ‘दिल तडप तडप के केह रहा है’ असं सुप्रिया म्हणाल्या.
-
आवडते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की देवेंद्र फडणवीस? असं विचारल्यावर त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं.
-
आवडता दादा अजितदादा की राजेंद्र दादा? असं विचारल्यावर माझे बाकीचे चार भाऊ नाराज होतील, असं म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं.
-
आवडत्या वहिनी कोण? सुनेत्रावहिनी, सुनंदावहिनी, शर्मिलावहिनी असं विचारल्यावर सगळेच बॉल खेळायचे नसतात म्हणत उत्तर त्यांनी नाव निवडलं नाही.
-
आवडते शहर दिल्ली की बारामती, यावर त्यांनी बारामती म्हटलं.
-
आवडता भाचा रोहित पवार की पार्थ पवार? यावर आईला सगळी मुलं सारखी असतात असं त्या म्हणाल्या.
-
राजकारणातील आदर्श शरद पवार की नरेंद्र मोदी? यावर त्या फक्त हसल्या.
-
सर्वात प्रिय व्यक्ती कोण, शरद पवार, प्रतिभाताई पवार की सदानंद सुळे? या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी आईचं नाव घेतलं.
Vaibhav Suryavanshi: १४ वर्षीय वैभवने रचला इतिहास! ३५ चेंडूत झळकावलं वादळी शतक