-
भारताच्या दळणवळणामध्ये रेल्वेचा मोठा वाटा आहे. भारतात कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करतात.
-
भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क असून भारताच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचं जाळ विखुरलेलं आहे.
-
आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी रेल्वेने प्रवास केला असेलच, बहुतांश लोकांना रेल्वेच्या अनेक नियमांविषयी माहिती नसते.
-
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की कधी कधी ट्रेनला स्टेशन येण्यापूर्वीच काही अंतरावर थांबवलं जात.
-
कधी कधी एक, दोन तास किंवा त्याहून अधिक वेळ ट्रेन उभी ठेवली जाते. असे अनेकदा होते.
-
पण रेल्वे अशी का थांबवली जाते, याचे कारण तुम्हाला माहिती आहे का..? चला तर जाणून घेऊया…
-
भारतीय रेल्वे नेटवर्कची व्याप्ती खूप मोठी आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. भारतीय रेल्वे ६८,१०३ किमी लांबीसह जगातील चौथ्या नंबरचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.
-
याठिकाणी दररोज हजारो ट्रेन धावतात. यापैकी काही गाड्या लोकल आहेत तर काही लांब पल्ल्याच्या आहेत.
-
या गाड्या स्टेशनवर येण्यापूर्वी एक ठराविक वेळ निश्चित केली जाते. ज्यांच्यानुसार घोषणाही केली जाते. यासोबत प्रत्येक ट्रेनसाठी एक प्लॅटफॉर्मही निश्चित करण्यात आला आहे.
-
काही कारणांमुळे गाड्या उशिरा येतात. याचे कारण म्हणजे यावेळी दुसरी ट्रेन येण्याची वेळ होते.
-
अशावेळी स्टेशन मॅनेजर ट्रेननुसार कोणती ट्रेन आधी स्टेशनवर आणायची ते ठरवतात. जर सुपरफास्ट ट्रेन आली आणि पॅसेंजर ट्रेन येत असेल तर तिला बाहेरच्या बाजूने थांबण्याची सूचना दिली जाते.
-
त्यामुळे ती ट्रेन बाहेरच्या बाजूने थांबवली जाते. यामुळेच कधीकधी ट्रेन स्टेशनला येण्याआधीच काही अंतरावर थांबविल्या जातात. (फोटो सौजन्य : indian express)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”