-
७ ऑक्टोबर रोजी, पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने इस्रायलला लक्ष्य करत सुमारे २,२०० क्षेपणास्त्रे डागली आणि बंदुकधारींची एक गट सीमेवर पाठवली.
-
त्याच सुमारास इस्रायलने प्रत्युत्तरादाखल हल्ले सुरू केले. नेतन्याहू यांनी त्यांचे पहिले सार्वजनिक विधान केले: “इस्रायल युद्धात आहे”.
-
इस्रायलने याची पुष्टी केली की, त्यांचे किमान १०० नागरिक आणि सैनिक हमासच्या सैनिकांनी बंदी केले आहे.
-
पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने गाझा पट्टीवरून इस्रायलवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे इस्रायलनेही गाझा पट्टीवरील नागरिकांची नाकाबंदी केली आहे. पाणी, अन्न, इंधन पुरवठा बंद करण्यात आला आहे.
-
इस्रायलच्या संरक्षण दलाने गाझा पट्टीत हवाई हल्ले केले. त्यांनी संभाव्य ग्राउंड ऑपरेशनचे संकेत दिले आहेत.
-
इस्त्रायली हल्ल्यांदरम्यान घरे सोडून पळून गेलेले पॅलेस्टिनी नागरिकांना युनायटेड नेशन्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळेत आश्रय दिला आहे.
-
दरम्यान, २४ तासांच्या आत उत्तर गाझा रिकामे करण्याचे आदेश इस्रायलने दिले आहेत. यामुळे जवळपास ११ लाख नागरिकांना गाझातून स्थलांतरीत व्हावं लागणार आहे.
-
इस्रायली हल्ल्यांमुळे घरातून पळून आलेली पॅलेस्टिनी मुलांना, गाझामधील युनायटेड नेशन्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळेत आश्रय दिला आहे.
-
इस्रायल-हमास युद्धातील एक दृश्य

“मी एकटाच वेगळा…”, नाना पाटेकरांनी पत्नीबरोबर न राहण्याबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिचे खूप उपकार…”