-
भाजपा नेते गोपीचंद पडळकर अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळेंवर टीका करत असतात.
-
अलीकडेच पडळकरांनी अजित पवारांचा उल्लेख ‘लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू’ तर सुप्रिया सुळेंचा उल्लेख ‘लबाड लांडग्याची लेक’ असा केला होता.
-
गोपीचंद पडळकरांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण तापलं होतं.
-
यानंतर आता गोपीचंद पडळकरांनी कुणाचंही नाव न घेता, साहेब, दादा आणि ताईसाहेब हे सगळं फेकून द्या, असं सूचक विधान केलं आहे. ते वर्धा येथे धनगर समाजाच्या कार्यक्रमात बोलत होते.
-
आपण गुलामगिरीत आहोत. इंग्रजांनी या देशात जशी गुलामगिरी राबवली, तशा पद्धतीने प्रस्थापितांनीही गुलामगिरी राबवली- गोपीचंद पडळकर
-
गुलामगिरीची काही प्रतिकं आहेत. साहेब, दादा, ताई, ताईसाहेब ही सगळी गुलामगिरीची प्रतिकं आहेत- गोपीचंद पडळकर
-
यांना साहेब वगैरे म्हणत बसू नका. तरच तुमची प्रगती होईल. हे साहेब, दादा किंवा ताईसाहेब हे सगळं बाजुला फेकून द्या. हे आपल्याला नियंत्रणात, गुलामगिरीत ठेवतात – गोपीचंद पडळकर
-
प्रस्थापितांचा पोरगा एका दिवसात मतदारसंघाचा भाग्यविधाता होतो. पण गोरगरीब भटक्या, विमुक्तांचा ओबीसींचा मुलगा दहा-दहा वर्षे राबला तरी त्याला नेता होता येत नाही- गोपीचंद पडळकर
-
ही काय व्यवस्था आहे, ही काय भानगड आहे? यावर आपण का विचार करत नाही- गोपीचंद पडळकर
-
मी काही बोलायला लागलो की,गोपीचंद काहीही बोलतो, असं म्हणतात – गोपीचंद पडळकर
-
पण मी काहीही बोलतो म्हणजे शिव्या देतो का? मी मुद्यावरच बोलतो. मी जे मुद्दे मांडतो, त्यावर त्यांनी (विरोधकांनी) बोलावं- गोपीचंद पडळकर
-
सर्व फोटो सौजन्य-लोकसत्ता

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर