-
भाजपा नेते व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वाघनंख आणण्याबाबत करार करण्यासाठी इंग्लंडला गेले होते. ते वाघनखं न घेताच परत आले आहेत.
-
यावरून प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली आहे.
-
“सुधीरभाऊ, वाघनखं आणायला गेले होते. त्यांनी वाघनखं तर आणलीच नाहीत. पण आता त्यांना खाजवायलाही नखं राहिली नाहीत”, असा टोला बच्चू कडूंनी एका कार्यक्रमात लगावला होता.
-
सुधीर मुनगंटीवार हे वाघनखं न घेताच परत येत आहेत. ते ५०-६० लाख रुपये खर्च करून तिथे गेले-बच्चू कडू
-
हे काम फोनवरूनही करता आलं असतं. मोदीजी डिलीटल इंडिया म्हणतात आणि आमचे मंत्री तिथे व्यक्तीश: जातात आणि मोकळ्या हाताने परत येतात-बच्चू कडू
-
सुधीरभाऊंनी असं करावं, हे चुकीचं आहे. ते मोठे देशभक्त मंत्री आहेत-बच्चू कडू
-
सुधीर मुनगंटीवार यांनी जाण्या-येण्यासाठी ५० लाख रुपयांचा खर्च करावा, हे मला काही आवडलं नाही-बच्चू कडू
-
त्यांनी वाघनखं आणली असती, तर चांगली गोष्ट होती. दोन-तीन वर्षांसाठी वाघनखं उसणे आणणे, ही त्यांच्या डोक्यातील कल्पनाही चांगली आहे-बच्चू कडू
-
मला वाटतंय आम्हीही तुमच्याबरोबर येतो, आपण वाघनखं लुटूनच आणू-बच्चू कडू
-
बच्चू कडूंच्या उपरोधिक टीकेला सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं.
-
बच्चू कडू यांनी असं उपाहासात्मक बोलण्याची आवश्यकता नव्हती. उद्या ते आमदारकीच्या निवडणुकाही घेऊ नका, असं म्हणतील -सुधीर मुनगंटीवार
-
कारण आमदारकीच्या निवडणुकांसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात. एका लोकसभेच्या निवडणुकीला २५ कोटींचा खर्च होतो-सुधीर मुनगंटीवार
-
त्यामुळे २० वर्षांतून एकदा निवडणुका घ्या, अशी सूचना त्यांनी केली नाही, हे बरं झालं-सुधीर मुनगंटीवार
-
बच्चू कडूंकडून ही अपेक्षा नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक आस्था असणाऱ्या वाघनखांच्या बाबतीत त्यांनी असं भाष्य केलं असेल तर ते योग्य नाही-सुधीर मुनगंटीवार
-
शेवटी त्यांनाही लाखो रुपयांचा पगार जनतेनं कराच्या रुपात भरलेल्या पैशातून दिला जातो. तो पगार घेताना त्यांना असं काही वाटलं नाही-सुधीर मुनगंटीवार
-
उद्या अधिवेशन ऑनलाईन घेतलं तर करोडो रुपये वाचतील, अशी सूचना त्यांची कदाचित असू शकते-सुधीर मुनगंटीवार
-
-
सर्व फोटो सौजन्य-लोकसत्ता
पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ