-
पॅलेस्टाईन दहशतवादी गट हमास आणि इस्रायलमधील युद्धाला १० दिवस पूर्ण झाली आहेत. या युद्धात आतापर्यंत ४ हजार लोक मारले गेले आहेत, ज्यामध्ये २६०० पॅलेस्टिनी आणि १४०० इस्रायली लोकांचा समावेश आहे. तर या युद्धात १० हजाराहून अधिक जखमी. दोन्ही देशांच्या सीमेवर केवळ बॉम्बवर्षाव गोळीबार आणि आक्रोश सुरू आहे. (एपी फोटो)
-
इस्रायलने गेल्या आठवड्यात हमासच्या हल्ल्याचा बदला म्हणून गाझापट्टीचं इंधन, पाणी, अन्न आणि वीजपुरवठा खंडित केला आहे. आता पुढील २४ तासांत गाझा पट्टीतील रुग्णालयांमधील इंधन संपणार असल्याचा इशारा यूएनच्या मानवतावादी कार्यालयाने दिला आहे. (एपी फोटो)
-
गाझामध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांना मदत करण्यासाठी आणि त्यांना युद्धभूमीतून बाहेर काढण्यासाठी इस्रायलने युद्धविराम केल्याचं वृत्त इस्रायलने फेटाळून लावलं आहे. (एपी फोटो)
-
गाझाच्या सीमेवरील रफाह क्रॉसिंग परिसरात इस्रायलने बॉम्बवर्षाव केला असून इस्रायल आता पॅलेस्टिनी जमिनीवर अतिक्रमण करण्याची तयारी करत आहे, असा दावा इजिप्तने केला आहे. (एपी फोटो)
-
पॅलेस्टाईनमधील पीडित लोकांना मदत घेऊन जाणारे ट्रक रफाह सीमेवर अडकून पडले आहेत. दोन्ही देशांतील संघर्षादरम्यान, मदत घेऊन जाणारे ट्रक गाझामध्ये प्रवेश करण्यासाठी रफाह सीमा पुन्हा उघडण्याची वाट पाहत आहेत. (रॉयटर्स फोटो)
-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एका मुलाखतून इस्रायलला इशारा दिला आहे. गाझा पुन्हा ताब्यात घेणे ही एक “मोठी चूक” असेल, असं बायडेन यांनी म्हटलं आहे. यावर संयुक्त राष्ट्रातील इस्रायलच्या राजदूताने आज सांगितलं की, गाझा ताब्यात घेण्याचा इस्रायलचा हेतू नाही. (एपी फोटो)
-
इस्रायली सैन्याने सोमवारी सांगितले की, हमास आणि इतर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी गाझामध्ये १९९ लोकांना ओलीस ठेवले आहेत. हा आकडा मागील अंदाजापेक्षा जास्त आहेत. (रॉयटर्स फोटो)
-
इस्रायलच्या आवाहनानंतर उत्तर गाझामधील एक लाखाहून अधिक लोक दक्षिण गाझा पट्टीत दाखल झाले आहेत. इस्रायली हल्ल्यांदरम्यान घरे सोडून पळून गेलेले सर्व पॅलेस्टिनी नागरीक यूएन संचालित शाळेत आश्रय घेत आहेत. (रॉयटर्स फोटो)
-
दोन्ही देशातील संघर्षादरम्यान अमेरिकन नागरिक मायदेशी परताना (रॉयटर्स फोटो)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”