-
नवरात्रो उत्सवाला सुरुवात झाली आहे.नवरात्रोत्सव हा माँ दुर्गेच्या नऊ रूपांना समर्पित आहे. याकाळात भक्त देवीची मनोभावे पुजा- प्रार्थना करतात. सर्वत्र उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण पसरलेले असते.
. नवरात्रोत्सव हिंदू दिनदर्शिकेनुसार शरद ऋतुमध्ये साजरा केला जातो आणि याला शारदीय नवरात्री असेही म्हणतात. पंचांग नुसार, यावर्षी नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबरला सुरू झाला असून आणि २४ ऑक्टोबरला संपणार आहे या उत्सवातील काही फोटो पाहा. (पीटीआय फोटो) -
गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात ‘नवरात्री’ उत्सवात भाविक प्रार्थना करताना. (पीटीआय फोटो)
-
अमृतसरमध्ये नवरात्रीच्या उत्सवादरम्यान धार्मिक मिरवणुकीतील कलाकार (पीटीआय फोटो)
-
मुंबईतील अंधेरी येथे नवरात्रीच्या उत्सवादरम्यान दिव्यांग मुले गरबा आणि दांडिया खेळताना. (पीटीआय फोटो)
-
गुवाहाटीमध्ये सुरू असलेल्या नवरात्रोत्सवादरम्यान कामाख्या मंदिरात भक्तांनी प्रज्वलित केले मातीचे दिवे. (पीटीआय फोटो)
-
जम्मूमध्ये चालू असलेल्या नवरात्रोत्सवादरम्यान काली माता मंदिरात भाविक प्रार्थना करतात. (पीटीआय फोटो)
-
भोपाळमधील नवरात्रोत्सवादरम्यान ‘कोल्हापुरच्या श्री महालक्ष्मी मंदिरा’व आधारित थीम असलेला दुर्गा पूजा मंडप उजळून निघाला. (पीटीआय फोटो)
-
अमृतसरमध्ये नवरात्रीच्या उत्सवादरम्यान धार्मिक मिरवणुकीत कलाकार. (पीटीआय फोटो)
-
केनियातील नैरोबी येथे नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी केनियन हिंदू मुली नृत्य करतात. नवरात्रीचा हिंदू सण केनियामध्ये साजरा केला जातो. (एपी फोटो/अब्दुल अझीम सय्यद)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख